Saturday, June 20, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा येथील अवैध दारू विक्रेत्यांना मुक्तीपथ ग्रामस्तरीय समितीने नोटिसाद्वारे दिली तंबी…-गावात मादक...

कोंढाळा येथील अवैध दारू विक्रेत्यांना मुक्तीपथ ग्रामस्तरीय समितीने नोटिसाद्वारे दिली तंबी…-गावात मादक पदार्थ विक्री करतांना आढळल्यास ५ हजार रुपये दंड…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावामध्ये अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर फोफावली असून गावामध्ये नवनवीन दारूचे अवैध धंदे सुरू झाले आहेत.अशातच ओठावर मिसरूड फुटण्याच्या अवस्थेत असणारे युवक व तरुण मंडळी तसेच वयोवृध्द दारूच्या आहारी जाऊन सर्वकाही गमावून बसले आहेत.कित्तेकांची संसारे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने यावर कुठेतरी आळा घातला जावा; यासाठी कोंढाळा येथील मुक्तीपथ ग्रामस्तरीय समितीच्या वतीने गावातील प्रत्येक अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या घरी जाऊन गावात मादक पदार्थ विक्री करतांना आढळल्यास ५ हजार रुपये दंड व दंडात्मक रक्कम न दिल्यास दंडात्मक रकमेपर्यंत वस्तू जप्त करण्यात येणार असल्याची तंबी नोटिसाद्वारे आज दिनांक- ११ मे रोजी दुपारच्या सुमारास दारू विक्रेत्यांना देण्यात आली आहे.

देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावामध्ये जुने व नवीन अवैध दारू विक्री करणारे जवळपास ४० दारू विक्रेते आहेत.गावामध्ये कोणती दारू मिळतेय; म्हणण्यापेक्षा कोणता ब्रँड हवा? असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.अवैध दारू विक्री मध्ये थंडीगार बियर पासून ते गावठी मोहफुलाची दारू,देशी,विदेशी दारू,पावडर मिश्रित सिंधी व ताळी असे अनेक ब्रँड एका झटक्यात मिळत असूनही पोलीस प्रशासनातील बीट अंमलदार यांच्याकडून कारवाई होतांना दिसून येत नाही.त्यामुळेच अनेक अवैध दारू विक्रेत्यांची हिम्मत वाढून अनेकजण अवैध दारू विक्रीच्या भरवशावर बलाढ्य होऊ लागले आहेत.अशातच ‘अवैध दारू विक्रेत्यांची घरे मस्त’ तर ‘पिनाऱ्यांची घरे उद्ध्वस्त’ असे विदारक चित्र नजरेसमोर निदर्शनास येऊ लागले आहे.दिवसाढवळ्या तसेच रात्रौच्या सुमारास गावामध्ये अवैध दारूचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर केला जात असून याकडे पोलीस प्रशासन एवढी चुप्पी साधण्या मागचे कारण काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे गावात मादक पदार्थ विक्री करतांना आढळल्यास ५ हजार रुपये दंड आकारण्या सोबतच शासकीय दाखले सदर कुटुंबास देण्यात येणार नसल्याचेही सांगितले जात असल्याने गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांची धंदे खरोखरच हद्दपार होणार काय? असाही प्रश्न अनेकांच्या मनात घर करून सोडत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!