उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोलीच्या वतीने येत्या २६ मे २०२४ रोज रविवारला सकाळी ११ वाजता झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या “महापूजा अर्थात महासती सावित्री” या गाजलेल्या महानाट्याच्या पुस्तकाचे प्रकाशन व लोकार्पण सोहळा केमिस्ट भवन,चामोर्शी गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे निमित्ताने ‘नाट्यश्री’ च्या वतीने राज्यस्तरीय कवींचे कविसंमेलनही घेण्यात येणार असून प्रत्यक्ष सहभागी कवींना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.तरी इच्छुक कवींनी आपली नावे चुडाराम बल्हारपुरे यांचे व्हाॅट्सअप नं. ९६२३६६३४३५ वर त्वरीत नोंदवावीत.असे आवाहन नाट्यश्रीचे वतीने करण्यात आले आहे.वेळेवर आलेल्या कवींना सहभागी करून घेता येईलच असे नाही.कवीसंमेलनसाठी आलेल्या नावांमधून निवडक कविंनाच संधी देण्यात येणार आहे.निवडक कवींची यादी नंतर जाहीर करण्यात होणार असून व्हाट्सअपद्वारे कळविण्यात येणार असल्याचे नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.

