Thursday, September 3, 2026
Homeभंडाराकुकर उघडतांना स्फोट; ६ जणांची प्रकृती गंभीर..

कुकर उघडतांना स्फोट; ६ जणांची प्रकृती गंभीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-महाप्रसाद तयार करण्यासाठी ४० लिटर क्षमतेच्या प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला. महाप्रसाद तयार झाल्यानंतर कुकर उघडतांना अचानकपणे धडाम असा जोरदार स्फोट होऊन जवळच असलेल्या नागरिकांवर कुकरमधील गरम  महाप्रसाद शरीरावर उडाले.यात १४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा शहरातील बाबा मस्तान शहा वार्डात शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.जखमींना तातडीने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारानंतर सात जणांना सुटी देण्यात आली.तर इतर सात जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान,खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी रुग्णालय गाठून जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.स्फोटात विक्की गणवीर,साधना गणवीर,गीता अंबुलकर,ज्योती नन्हे,माया मारवाडे, चित मारवाडे,सविता साठवणे,परवेज शेख, आशिष गणवीर,भावेश खंगार आणि रितेश साठवणे असे १४ जण जखमी झाले होते.यातील सहा जण गंभीर जखमी असून एकजण किरकोळ जखमी असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत.शनिवारी बाल उत्सव शारदा मंडळाच्या वतीने महाप्रसाद बनविण्याचे काम सुरू होते.महाप्रसाद शिजल्यानंतर मंडळातील कार्यकर्त्यांनी प्रेशर कुकरचे झाकण उघण्याचा प्रयत्न केला असता मोठा स्फोट झाला होता.प्रत्यक्षदर्शिंच्या मते,आवाज इतका मोठा होता की,शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत काय झाले? म्हणून घटनास्थळी गोळा होत सर्वप्रथम जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!