Wednesday, June 24, 2026
Homeचंद्रपूरकिती बदमाश म्हणावे हे चोरटे..! आता तुम्हीच सांगा; शेतकऱ्याच्या बैलबंडीची चाके कुठे...

किती बदमाश म्हणावे हे चोरटे..! आता तुम्हीच सांगा; शेतकऱ्याच्या बैलबंडीची चाके कुठे चोरायचीच होत कां?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-सर्वसाधारण चोरी जरी असली तरीही ती चोरीच समजली जाते.चोरटे कधी देवाच्या मंदिरातील दान पेटी चोरून नेतात,तर कधी कुणाची घरफोडी, दुकानातील साहित्य चोरी वा विविध तऱ्हेच्या चोऱ्या करून छोट्या-मोठ्या रकमेवर डल्ला मारतांना दिसून येतात.पण,बिचाऱ्या शेतकऱ्याने अगोदरच भंगार विक्रेत्याकडून बैलगाडीसाठी दोन लोखंडी चाके खरेदी केली होती आणि आता त्याही चाकांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याने किती बदमाश म्हणावे हे चोरटे,अशी म्हणण्याची वेळ आली आहे.सदरची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील तळोधी (गोवर्धन वार्ड)येथे उघडकीस आली असून याप्रकरणी ५५ वर्षीय शेतकरी भोजराज काशीनाथ पाकमोडे यांनी काल बुधवारी तळोधी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
भोजराज पाकमोडे यांनी दोन वर्षांपूर्वी ओवाळा येथील भंगार विक्रेत्याकडून दोन लोखंडी चाके खरेदी करून बैलगाडीवर बसविली होती.भोजराज हे शेतमजुरीसह स्थानिक ग्रामस्थांचे साहित्य ने-आण करण्यासाठी बैलगाडीचा वापर करतात.मंगळवारी त्यांनी नेहमीप्रमाणे आपली बैलबंडी घरासमोरील डांबरी रस्त्याच्या कडेला लावली होती.रात्री १० वाजे पर्यंत बैलबंडी नेहमीसारखी जागेवरच होती.मात्र,काल बुधवारी बघतात तो काय बैलगाडीची दोन्ही लोखंडी चाके गायब असल्याचे त्यांना दिसून आले.त्यानुसार, परिसरात तसेच इतरत्र चौकशी करून शोध घेतला; मात्र चाके कुठेही आढळून आली नाहीत.प्रकरणी त्यांनी पोलिस ठाणे गाठून आपबिती कथन केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!