Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीउद्याला श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या रथ आगमनाचे आयोजन..

उद्याला श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या रथ आगमनाचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पूर्वतयारीकरिता निवासी उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाचा नुकताच आढावा घेण्यात आला.सदर बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे यांच्यासह तहसिलदार(आस्थापना) सचिन जयस्वाल, लालसिंग खालसा,गोवर्धन सुरजमल चव्हाण,सुनील सिंग पटवा,अजयसिंग पटवा,विनोद यदुराव बनोत, सलानंदसिंग डि.डांगी,कतारसिंग मेंडसिंग डांगी,गोपाळ देवजी साबळे,जितेंद्र बी. सहला,अमरसिंग एस.गेडाम, विवेक नाकाडे आणि राजासिंग बरियासिंग डांगी आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये विविध महत्त्वाच्या मुद्यांवर कार्यवाही निश्चित करण्यात आली.यामध्ये येत्या ७ डिसेंबर २०२५ ला नागपूरमधील कार्याक्रमामध्ये अन्नदान व सेवा देण्याबद्दल सहकार्य करण्याचे ठरले.तसेच, देसाईगंज येथे होणाऱ्या ३५० व्या शहिदी समागम दिनानिमित्त श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या रथ आगमनाच्या आयोजनावर चर्चा करण्यात आली. गडचिरोली येथे उद्या,गुरुवार ४ डिसेंबर २०२५ ला होणाऱ्या रथ आगमनाचे नियोजन व कार्यवाही करण्याच्या दृष्टीने शिक्षणाधिकारी (प्राथ.),पोलीस आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.याव्यतिरिक्त,नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी गडचिरोली येथून नागपूरला जाणाऱ्या प्रतिनिधींच्या सुविधांच्या व्यवस्थेवर चर्चा करण्यात आली.निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार,श्री.गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या महान कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे तसेच गडचिरोली येथील रथ आगमनाच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे ताफा व्यवस्थापनावर चर्चा व कार्यवाही करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!