Tuesday, August 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकेवळ आठवडाभरच चालणार हिवाळी अधिवेशन..

केवळ आठवडाभरच चालणार हिवाळी अधिवेशन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याची उराजधानी नागपूर येथे येत्या,सोमवार ८ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे.नागपूर येथील हिवाळी अधिवेशन किती दिवस चालणार,याबाबतचा निर्णय आज,बुधवार ३ डिसेंबरला जाहीर करण्यात आला आहे.आज विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.अधिवेशन येत्या ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या आठवडाभराच्या कालावधीत चालणार आहे.८ डिसेंबर रोजी कार्यक्रम पत्रिकेत दर्शवलेली प्रश्नोत्तरे शनिवार १३ डिसेंबर रोजी घेण्यात येतील तर, १६ डिसेंबरच्या कार्यक्रम पत्रिकेतील प्रश्नोत्तराचा तास १४ डिसेंबरच्या कामकाजात असेल.बैठकीत सर्वानुमते या तारखांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.बैठकीला विधान परिषद सभापती राम शिंदे,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील,सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार,विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार,दीपक केसरकर,जितेंद्र आव्हाड,भास्कर जाधव,सुनील प्रभू,अमीन पटेल विधानपरिषद सदस्य अनिल परब,प्रसाद लाड,प्रवीण दरेकर,विक्रम काळे, सतेज पाटील,विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित अधिकारी उपस्थित होते.या आठवडाभराच्या कालावधीत राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा,वादविवाद आणि महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत.अधिवेशनाची तारीख निश्चित झाल्यामुळे आता प्रशासकीय पातळीवर तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या रणनीतीच्या तयारीला वेग येणार आहे.या आठवडाभरात राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!