Sunday, June 14, 2026
Homeदेसाईगंजकिडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी बांधव संकटात... -नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या..-आरमोरी...

किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी बांधव संकटात… -नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या..-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील शेतकरी बांधव पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडला आहे.दरवर्षीच शेतकरी कधी अस्मानी,तर कधी सुल्तानी संकटात वेढला जातो.यावर्षी पाऊस चांगला पडला असला तरी अनेक शेतकरी बांधवांचे हातचे धान पीक जाण्याची भिती सतावत आहे. आता ऐन धान पीक निसावले असतांना अळी आणि तुळतुळा रोगाने धानावर हल्ला चढविला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.उल्लेखनीय म्हणजे कीडरोगांनी पिकांची नासाडी झाल्यास त्याला शासनाची भरपाई देखील मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आला आहे.त्यामुळे शासनाने कीडरोगांनी पिकांची नासाडी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी; अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते तथा शेतकरी नेते रामदास मसराम यांनी केली आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला खरीप हंगामात निसर्गाने शेतकऱ्यांना दगा दिला.ऑगस्ट महिन्यात देखील पाऊस बेपत्ता झाला होता.मात्र,शेवटच्या आठवड्यात पाऊस परतला.पाऊस चांगला येत असताना गाद आणि करपा या रोगांनी धानावर हल्ला चढविला.आता धान पीक निसावून धानाचा टोला बागवित असतांना अळी आणि तुळतुळा रोगाने धानावर हल्ला चढविला आहे. उल्लेखनीय म्हणजे शेतकरी आपल्या पिकाचा विमा काढतात.मात्र किडरोगांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची तरतूद त्यात नाही.परिणामी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांनी कीटकनाशकाशकांची फवारणी करण्याचे आवाहन करण्यात येते.आधीच कर्जामुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांपुढे नवीन संकट निर्माण झाले असून यावर्षी अनेक शेतकरी बांधवांना अर्धे देखील उत्पन्न हाती येण्याची शास्वती नाही.परिणामी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आला आहे.सध्या धानाचे पीक निसावून लोंब निघाले आहेत.अशातच अळी आणि तुळतुळा रोगाचा प्रकोप वाढला आहे.अळी रोगाचा किडा धानाच्या वर जाऊन लोंबाला कातरतो आणि लोंबाची मान गळून पडते.त्यामुळे लोंब भरून निघत नाही व पूर्णपणे सुकून फोल पडत असल्याने त्यातून एक दाणा देखील पीक येत नाही.पावसाचा कमी-जास्तपणा यामुळे पिकांची हानी झाल्यास त्याची नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र,किंडरोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई शासनाकडून देण्यात येत नाही.त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस येत आर्थिक संकटात सापडला असल्याने नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी; अशी मागणी मसराम यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!