Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरकाय सांगता..? १४० रुपयांसाठी स्टॅम्प पेपर विक्रेता व मदतनीस एसीबीच्या जाळ्यात..!

काय सांगता..? १४० रुपयांसाठी स्टॅम्प पेपर विक्रेता व मदतनीस एसीबीच्या जाळ्यात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-दोन हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी अतिरिक्त रकमेची मागणी करणाऱ्या स्टॅम्प विक्रेता व त्याच्या मदतनीस महिलेस चंद्रपूर ॲन्टी करप्शन ब्युरो(एसीबी) च्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याची घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.प्रकरणी मनिष अरूण देशमुख,मुद्रांक पेपर विक्रेता,रा.जलनगर वार्ड,चंद्रपूर व आरोपी मदतनीस रूपाली भरतलाल चौधरी यांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचा व अधिकाराचा अप्रामाणीकपणे वापर करून शासनाने नेमुन दिलेल्या किंमतीपेक्षा अधिकच्या रूपयाची लाच मागणी करून स्वीकारल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,यातील तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांना विज टेंडर कामाकरीता ५०० रूपयाचे ३ मुद्रांक पेपर्स(स्टॅम्प पेपर) व १०० रूपयाचे ५ मुद्रांक पेपर्स असे एकुण २ हजार रूपयाचे मुद्रांक पेपर्सची आवश्यकता होती. त्यासाठी तक्रारदार हे मुद्रांक विक्रेता मनिष देशमुख यांच्याकडे स्टॅम्प पेपर खरेदीकरिता गेले असता प्रत्येक ५०० रूपयाचे मुद्रांक पेपर्सवर ३० रुपये असे ३ पेपर्सचे ९० रूपये व प्रत्येक १०० रूपयाचे मुद्रांक पेपर्सवर १० रूपये असे ५ पेपर्सचे ५० रूपये असे एकुण २ हजार रूपयाचे मुद्रांक पेपर्सवर २ हजार रुपये शासकीय शुल्कासह अतिरीक्त १४० रूपये लाच दिल्याशिवाय मुद्रांक पेपर्स देणार नसल्याची तक्रारदार यांना खात्री होती.त्यामुळे तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी गुरुवार ३० ऑक्टोंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय चंद्रपुर येथे प्रत्यक्ष हजर होऊन तक्रार दिली.तक्रारदार यांचे प्राप्त तक्रारीवरून काल,शुक्रवारी ३१ ऑक्टोंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता मुद्रांक पेपर विक्रेता मनिष देशमुख याने २ हजार रूपयाचे मुद्रांक पेपर्सवर शासकीय शुल्कासह अतिरीक्त १४० रूपये लाच रक्कम असे एकुण २१४० रूपये लाच रक्कमेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून काल,शुक्रवार ३१ ऑक्टोंबर २०२५ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान मुद्रांक पेपर विक्रेता मनिष देशमुख यांनी शासकीय शुल्कासह अतिरीक्त १४० रूपये लाच रक्कम असे एकुण २ हजार १४० रूपये स्विकारून मदतनीस रूपाली  चौधरी हिचेकडे दिल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले.दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासकार्य सुरू आहे.सदरची कार्यवाही डॉ.दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर,माधुरी बावीस्करअप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूर,मंजुषा भोसले पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि.चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश उरकुडे यांनी व सापळा पथक पोशि अमोल सिडाम,राकेश जांभुळकर,राजेंद्र चौधरी, म.पो.शि.पुष्पा काचोळे, चापोशि/सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,चंद्रपूर यांच्या पथकाने केली.
  • नागरीकांना आवाहन👇
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम(एजेंट)यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,कार्यालय नागपूर दुरध्वनी क्रमांक:- डॉ.दिगंबर प्रधान,पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर- ०७१२-२५६१५२०
श्रीमती माधुरी बावीस्कर,अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक :-०७१७२-२५०२५१
टोल फ्रि क्रमांक:- १०६४ 
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!