Thursday, September 3, 2026
Homeगोंदियाअपघात होताच आवाज उठवला जातो; त्यानंतर मात्र त्याचा विसर पडतो.. - रेल्वेच्या...

अपघात होताच आवाज उठवला जातो; त्यानंतर मात्र त्याचा विसर पडतो.. – रेल्वेच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-रेल्वेच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले असून वन्यजीव प्रेमी तसेच संबंधित विभागाकडून अपघातानंतर उपाययोजना आखण्यासंदर्भात आवाज उठवला जातो.त्यानंतर मात्र त्याचा विसर पडतो; अशी म्हणण्याची वेळ आली आहे.त्याचे कारणही तसेच आहे; नुसत्या एकट्या गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गाचा विचार केला तर आतापर्यंत गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गावर तब्बल १२५ वन्यप्राण्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.यात वाघासह इतर प्राण्यांचा सुद्धा समावेश आहे.त्यातच दरवर्षी या मार्गावर वन्यजीवांचा बळी जात असल्याने सदरचा मार्ग वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे.गोंदिया-बल्लारशा हा रेल्वे मार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य,नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प या ‘कॉरिडॉर’ लगत जातो. हाच रेल्वे मार्ग पुढे जबलपूर आणि बालाघाटपर्यंत तर चांदाफोर्ट पुढे तेलंगणापर्यंत जातो.त्यामुळे या रेल्वे मार्गावरून बरेचदा वन्यप्राण्यांची वर्दळ असते.त्यामुळेच रेल्वे विभागाने २०१८ मध्ये वन्यप्राण्यांसाठी असुरक्षित रेल्वे मार्गांची यादी जाहीर केली होती व उपाययोजनेबाबतही शिफारसी केल्या होत्या.यात गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गाचा सुद्धा समावेश होता परंतु,अद्यापही उपाययोजना केलेल्या नाहीत.त्यामुळे या रेल्वे मार्गावर वन्यप्राण्यांच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे.वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी या रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला तारांचे कुंपण,भुयारी मार्गासह इतर उपाययोजना करण्याची गरज आहे.पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!