- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विविध ग्रामपंचायतीत तब्बल ५७ लाख ८९ हजार ३५२ रुपयांवर तीन कंत्राटी तांत्रिक सहाय्यकांनी मिळून डल्ला मारल्याचा अचंभित करणारा प्रकार उघड झाल्याने तिघांनाही भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी तात्काळ सेवा समाप्तीचे आदेश देऊन घरी बसवले आहे.अश्यातच तिघांनाही सदर रक्कम २० दिवसांत परत करण्याचा कालावधी दिलेला आहे.रकमेचा भरणा न केल्यास फौजदारी कारवाई करण्याचेही आदेश दिले गेले असल्याने तिघांनाही मोठा घाम फुटला असल्याची चर्चा आहे. युवराज बारई,रविकांत तिडके आणि महेश निमजे अशी कंत्राटी तांत्रिक सहाय्यकांची नावे असून रविकांत तिडके याने ३० लाख ३० हजार ६७० रुपये,युवराज बारई याने २० लाख २४ हजार ७३२ रुपये तर महेश निमजे याने ७ लाख ३३ हजार ९५० रुपये,असे तिघांनी मिळून एकूण ५७ लाख ८९ हजार ३५२ रुपयाचे घबाड केले आहे.विशेष म्हणजे,मोहाडी पंचायत समितीत पाणंद रस्त्याच्या कामाबाबत अनेक तक्रारी असून यात बनावट हजेरी लावणे,घरोघरी जाऊन मजुरांकडून पैसे वसूल करणे,यंत्राने कामे करणे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अश्यातच रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील कामामध्ये अनियमितता, शासकीय रकमेचा अपहार करणे,शासकीय कर्तव्यात कसूर करणे,वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे, जाणीवपूर्वक कामात हयगय करणे असा ठपका ठेवण्यात आला आहे.
- Advertisement -

