Saturday, August 29, 2026
Homeभंडाराकर्मचाऱ्याचा चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच मद्यप्राशन...

कर्मचाऱ्याचा चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच मद्यप्राशन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-लाखनी तालुक्याच्या केसलवाडा वाघ येथील ग्रामपंचायत कार्यालयात जल व्यवस्थापन विभागात रोजंदारीवर असलेल्या एका कर्मचाऱ्याचा चक्क ग्रामपंचायत कार्यालयात मद्यपान करीत असल्याचा एक व्हिडीओ पुढे आल्यावरून खळबळ उडाली आहे.पारस शेंडे असे मद्यप्राशन करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
चार वर्षांपूर्वी गावातील नळ फिटिंग,विद्युत फिंटिंग, कर वसुलीची कामे करण्यासाठी रोजंदारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.ही कामे सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती. ग्रामपंचायत कार्यालयातच लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी हा कर्मचारी ग्रामपंचायतीच वास्तव्यास असायचा.चक्क सरपंच,उपसरपंच यांची पाटी लावलेल्या खुर्चीसमोर बसून तो मद्यपान करीत असल्याचे वायरल व्हिडीओत दिसत आहे.केसलवाडा ग्रामपंचायत इमारत दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मागील आठवड्यात ग्रामपंचायत प्राथमिक शाळेतील सांस्कृतिक सभागृहात हलविण्यात आली.या कर्मचाऱ्याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याने चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच डोलारा सुरू केल्याने सदर  प्रकाराची सखोल चौकशी करून त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 “ही इमारत आणि कर्मचारी आपल्याच ग्रामपंचायतीचा असून तो रोजंदारी कामगार” असल्याचे सरपंच स्वप्निल बोरकर यांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!