Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरकंत्राटी अभियंत्याने घरकुलाचे पैसे काढून देण्यासाठी २० हजार रूपयांची केली मागणी…-तडजोडीअंती १०...

कंत्राटी अभियंत्याने घरकुलाचे पैसे काढून देण्यासाठी २० हजार रूपयांची केली मागणी…-तडजोडीअंती १० हजार रूपये स्विकारले अन् अडकला एसीबीच्या जाळ्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- चिमूर तालुक्यातील कळमगाव येथील एका घरकुल लाभार्थ्यांकडून घरकुलाची रक्कम देण्यासाठी लाच मागणारा ग्रामिण गृहनिर्माण विभागाचा कंत्राटी कर्मचारी मिलींद मधुकर वाढई याला १० हजार रूपयाची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली असून त्याचा मित्र मिस्त्रीकाम करणारा आशिष कुशाब पेंदाम यालाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

चिमूर तालुक्यातील कळमगाव येथील रहीवासी असलेल्या तक्रारदारास शबरी आवास योजनेअंतर्गत सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरिता घरकुल मंजुर झाले होते.सदर घरकुल बांधाकामाकरीता तकारकर्ता यास चार टप्प्यात बांधकामानुसार रक्कम जमा होणार होती.तक्रारकर्ता यास घरकुल योजनेचे दोन किस्त ६५ हजार रूपये जमा झाले असुन तिसरा टप्पा ४५ हजार व चौथ्या टप्याचे २० हजार असे एकुण ६५ हजार रूपये जमा करून देण्याकरिता मिलींद मधुकर वाढई या कंत्राटी अभियंत्याने २० हजार रूपयाची मागणी केली.तडजोडीअंती १० हजार रूपये स्विकारण्याचे मान्य करून लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.त्याचा मित्र आशिष कुशाब पेंदाम यांना ताब्यात घेवुन पुढील तपास कार्य सुरु आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!