Sunday, August 9, 2026
Homeभंडाराऑर्डनन्स फॅक्टरीतील स्फोट प्रकरणी होणार चौकशी-पुणे येथील चमू झाली दाखल

ऑर्डनन्स फॅक्टरीतील स्फोट प्रकरणी होणार चौकशी-पुणे येथील चमू झाली दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- जवाहरनगर आयुध निर्माणी(ऑर्डनन्स फॅक्टरी) कंपनीत शनिवारी सकाळी ८.३० वाजता डीबीडब्ल्यू विभागात स्फोट होवून अविनाश भागवत मेश्राम (५०) या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.शवविच्छेदन झाल्यानंतर काल सकाळी ११ वाजता शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.विशेष म्हणजे या स्फोट प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे येथील मुख्यालयातून तज्ज्ञ अधिकाऱ्यांची चमू जवाहरनगर आयुध निर्माणीत तपास व चौकशीसाठी दाखल झाली आहे.आयुध निर्माणीत झालेला स्फोट व कामगाराच्या मृत्यूमुळे कर्मचाऱ्यांत दहशत व भीतीचे वातावरण असून ही धाकधूक कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आले.सुरक्षेच्या कारणावरून अंत्यसंस्कारावेळी कुजूबूज व चर्चा सुरू होती.

शनिवारी ही घटना घडल्यानंतर स्फोटाच्या कारणांसह कामगाराच्या मृत्यूच्या चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केल्याची माहिती आयुध निर्माणीचे डेप्युटी जनरल मॅनेजर यतीश कुमार यांनी दिली होती.तथापि कम्युनिशन्स इंडिया प्रायव्हेट लिमटेड, भारत सरकार रक्षा मंत्रालय पुणे येथील चिफ मॅनेजिंग डायरेक्टर रविकांत काल रविवारी आयुध निर्माणी जवाहरनगर येथे स्फोटप्रकरणी चौकशीसाठी दाखल झाले आहेत.  त्यांनी घटनास्थळी भेट दिली.मीटिंग हॉल येथे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी या घटनेविषयी चर्चा केली.मृतक अविनाश यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून जवाहरनगर येथील मोक्षधामावर जाऊन अंतिम संस्कारला हजेरी लावली.यावेळी महाप्रबंधक सुनिल सप्रे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!