Friday, September 25, 2026
Homeमुंबईसर्वच शाळांना पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य….-शालेय शिक्षण व मराठी...

सर्वच शाळांना पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य….-शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :-राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा हा अनिवार्य विषय आहे.मागील वर्षात काही मंडळाच्या शाळांना थोडीशी सवलत देण्यात आली होती; परंतु आता सर्वच शाळांना पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य असल्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांनी आज रविवारी नवी मुंबईत सांगितले.नवी मुंबईतील वाशी येथे सुरू असलेल्या विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी केसरकर यांनी हे प्रतिपादन केले.केसरकर पुढे म्हणाले,मराठी भाषेची सर्व मंडळे एकत्र आणण्यासाठी आपल्या राज्यातही लवकरच ‘मराठी भाषा भवना’ची निर्मिती होणार आहे.यासाठी शासनाने २६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

मराठी भाषा भवनाच्या निर्मितीनंतर मराठी भाषा संवर्धनाशी संबंधित असलेली सर्व कार्यालये,मंडळे ही एकाच इमारतीत येणार आहेत. त्यामुळे मराठी भाषा संवर्धनाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता व गती येईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाचा आवर्जून उल्लेख करीत केसरकर म्हणाले, मातृभाषेतून शिक्षण ही बाब काळाची गरज आहे. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे की, ज्याने इंजिनिअरिंगचे शिक्षणही मातृभाषा मराठीतून शिकविण्याचे धोरण स्वीकारले. प्रत्येक जिल्ह्याला मराठी भाषेचे काम करण्यासाठी निधीची तरतूद करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध उपक्रम, कार्यक्रमांमधून मराठी भाषा संवर्धनाचे काम जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न मराठी भाषा विभागाकडून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.पुढील वर्षी विश्व मराठी संमेलन घेण्यासाठी आम्हाला लवकर निधी मिळाला, तर त्याचे नियोजन यापेक्षाही अधिक चांगले करू आणि हे संमेलन वैश्विक स्तरावर आपला एक वेगळा ठसा उमटवेल, असा आमचा प्रयत्न राहील, असेही केसरकर म्हणाले. या वेळी आम्हाला खूप कमी वेळ मिळाला; तरीही आम्ही हे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!