उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली’ च्या वतीने नविन वर्षात “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे चौथे सत्र नुकतेच पार पडले असून यात २५ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून गडचिरोली येथील कवयित्री वंदना मडावी यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “ज्ञान तुकोबांचे’ या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
कवयित्री वंदना मडावी या झाडीपट्टीतील नवोदित कवी असून ते गडचिरोली येथील रहिवासी आहेत. ते विविध विषयांवर कवितांचे लेखन करतात. आजवर त्यांनी पन्नास च्या जवळपास कवितांचे लेखन केले असून विविध दैनिकातून त्यांचे लेख व कविता प्रकाशित झाल्या आहेत. सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे.अनेक पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या चौथ्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने राहूल शेंडे, गजानन गेडाम,प्रभाकर दुर्गे,स्वप्निल बांबोळे,मुर्लीधर खोटेले,पी.डी.काटकर,कृष्णा कुंभारे,प्रब्रम्हानंद मडावी, सुनील मंगर, वंदना मडावी, बाबाजी व्ही.हुले,वसंत चापले, प्रतिभा प्रविण सुर्याराव,मनिषा हिडको, लता शेंद्रे,माधुरी अमृतकर,संगीता ठलाल,मनोहर दुधबावरे, पुरुषोत्तम लेनगुरे,संजय बन्सल,चरणदास वैरागडे, रुपाली म्हस्के,ज्योत्स्ना बन्सोड,कु.विधी बन्सोड,सत्तू भांडेकर इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

