Saturday, September 12, 2026
Homeभंडाराऐन साक्षगंधाचा कार्यक्रम होणार,त्याच दिवशी होणारा नवरदेव झाला गायब; आज होता लग्न..

ऐन साक्षगंधाचा कार्यक्रम होणार,त्याच दिवशी होणारा नवरदेव झाला गायब; आज होता लग्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-ऐन साक्षगंधाचा कार्यक्रम होणार,त्याच दिवशी होणारा नवरदेव पहाटेच्या सुमारास गायब झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्याचे लग्न होते.अशातच होणारा नवरदेव गायब कां झाला? अश्या पेचप्रसंग सर्वजण पडले आहेत.राहुल काशीराम राऊत वय २६ वर्षे असे गायब झालेल्या तरुणाचे नाव आहे.सदरची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आलेसुर येथे नुकतीच उघडकीस आली आहे.
माहितीनुसार,राहुल राऊत याचे आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास विवाह सोहळा पार पडणार होता.तत्पूर्वी सोमवारी २८ एप्रिलला दुपारच्या सुमारास त्याचा साक्षगंधाचा कार्यक्रम होणार होता व काल,मंगळवारी २९ एप्रिलला मंडप पूजन होते.अशातच राहुल हा २८ एप्रिलच्या पहाटे कुणालाही काहीही न सांगता घरून निघून गेला.कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी इतरत्र शोध घेतला.मात्र,त्याचा थांगपत्ताच लागलेला नाही.त्यामुळे कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून मिसिंगची तक्रार दाखल केली.कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गोबरवाही पोलीस प्रशासन राहुलच्या शोधात आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!