Saturday, September 12, 2026
Homeनागपूरशैक्षणिक पात्रता नसतांनाही शाळांमध्ये संस्थाचालकांच्या घरचीच टीम..!

शैक्षणिक पात्रता नसतांनाही शाळांमध्ये संस्थाचालकांच्या घरचीच टीम..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपुरातील शिक्षण विभागात बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी सुरू असतांना धक्कादायक बाब समोर आली आहे.काही खासगी शाळांमध्ये संस्थाचालकांच्या पत्नी,मुलगा,सून व इतर नातेवाइकांची शिक्षक व कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे, यापैकी अनेकांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता नसतांनाही त्यांना शालार्थ आयडी कसे देण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मागील अनेक वर्षांपासून शिक्षण विभागात हा प्रकार सुरू आहे.
अशा शाळा वजनदार लोकांच्या असल्याने आजवर त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही.शालार्थ आयडी घोटाळ्याच्या निमित्ताने आता हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र कर्मचारी (सेवाशर्ती) नियम,१९८१ नुसार खाजगी शाळांमध्ये पात्र शिक्षकांचीच नियुक्ती करणे बंधनकारक आहे.त्यासाठी डीएड,बीएड किंवा संबंधित विषयात पदवी असणे आवश्यक आहे.
मात्र,अनेक प्रकरणांमध्ये या नियमांची पायमल्ली करून नातेवाइकांची भरती करण्यात आली आहे.हे सर्वकाही उघड्या डोळ्यांनी घडत असतांना शिक्षण खात्याने मंजुरी कशी दिली?असा केविलवाणा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!