Monday, September 21, 2026
Homeनवी दिल्ली'एसी' चा खर्च शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनीच करावा- दिल्ली उच्च न्यायालय

‘एसी’ चा खर्च शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनीच करावा- दिल्ली उच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :- शाळेतील वातानुकूलित यंत्र म्हणजेच एसीचा खर्च त्या ठिकाणी शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना करावा लागेल; अशी महत्त्वपूर्ण टिपण्णी दिल्ली उच्च न्यायालयाने केली आहे.’एसी’ हा मुलांच्या सोयीसाठी असून त्याचा आर्थिक भार एकटय़ा शाळा व्यवस्थापनावर टाकता येणार नाही; असेही न्यायालयाने म्हटले आहे.दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत पीएस अरोरा यांच्या खंडपीठासमोर पालकांच्या याचीकेवर सुनावणी झाली.

शाळेने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी जारी केलेल्या शुल्क पावतीमध्ये एसीसाठी वैगळे पैसे देण्याचा उल्लेख केला आहे.त्यामुळे शाळा निवडताना पालकांनीच आपल्या पाल्याला मिळणाऱ्या तेथील सुविधा आणि किंमत लक्षात घ्यावी; याकडे न्यायालयाने सुनावणी दरम्यान लक्ष वेधले.

एका पालकांचा मुलगा दिल्लीतील खासगी शाळेत इयत्ता ९ वीत शिकत आहे.शाळा व्यवस्थापन मुलांकडून त्यांच्या वर्गात एसी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महिन्याला दोन हजार रुपये शुल्क आकारत आहे.विद्यार्थ्यांना एसी सुविधा देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असल्याचा पालकांचा युक्तिवाद होता.त्यामुळे त्यांनी स्वतःच्या निधीतून हा खर्च उचलावा असे याचिकेत म्हटले होते. परंतु उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!