Thursday, October 15, 2026
Homeगडचिरोलीघातपात करण्याचा नक्षल्यांचा कट फसला…-पहाडावर नक्षल्यांनी दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी काढली...

घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट फसला…-पहाडावर नक्षल्यांनी दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी काढली हुडकून…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी आज सोमवार दिनांक- ६ मे रोजी सकाळी हुडकून काढली.यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट फसला.

पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक पार पडली असून निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड परिसरात स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.परंतु त्यावेळी ही स्फोटके पोलिसांना सापडली नाहीत.शिवाय मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त असल्यामुळे नक्षल्यांनाही घातपात करता आला नाही.परंतु काल स्फोटके असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्यानंतर सी-६० पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाचे जलद प्रतिसाद पथक तसेच बॉम्ब शोधक व नाशक विभागाचे दोन पथक टिपागड परिसरात पाठविण्यात आले.या पथकातील जवानांनी पहाडावर दडवून ठेवलेली स्फोटके,क्लेमोर माईन्स आणि प्रेशर कुकर्स हुडकून काढण्यात आले.

पोलिसांना घटनास्थळी स्फोटकांनी भरलेली ६ प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स, स्फोटके असलेली ३ क्लेमोर माईन्स आणि ३ रिकामी क्लेमोर माईन्स आढळून आली.शिवाय गन पावडर,ब्लँकेट आणि औषधेही तेथे सापडली.त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या पोलिसांनी ही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स नष्ट केली,अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाचन संस्कृतीच्या चळवळीत महात्मा गांधी शाळेचा पुढाकार.. – आज ‘ग्रंथालय आपल्या दारी’ उपक्रमाचा दिमाखात शुभारंभ; वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानसमृद्ध,वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज अशी पिढी घडविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक...

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!