Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरएका इसमास वाघाने उचलून नेल्याचा व्हिडिओ 'बनावट'.. - वन विभागाचा खुलासा..

एका इसमास वाघाने उचलून नेल्याचा व्हिडिओ ‘बनावट’.. – वन विभागाचा खुलासा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-सध्या सोशल मीडियावर एक इसम घराच्या आवारात बसलेला असतांनाच त्या ठिकाणी अचानकपणे वाघ येऊन त्याला जबड्यात घेऊन उचलून नेत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. काहींनी सदरची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वनविभागाच्या वनविश्रामगृहातील म्हटल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अश्यातच आता व्हायरल व्हिडिओवर वन विभागाच्या वतीने खुलासा सादर करण्यात आला आहे.चंद्रपूर वन वृत्ताचे मुख्य वनसंरक्षक आर.एम.रामानुजम यांनी प्रतिक्रिया देत सदरचा व्हिडीओ हा एआय(AI) जनरेटेड म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले आहे.सदरचा व्हिडिओ हा बनावट असून वनविभागात अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाही.काही समाजकंटकांनी जनतेमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याने बनावट व्हिडीओ तयार करणारे तसेच पोस्ट करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार,असे म्हटले आहे.नागरिकांनी अफवा पसरविणाऱ्या घटनांवर आधारीत व्हिडीओंवर विश्वास ठेवू नये,असेही आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
  • व्हिडिओ👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!