Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरएका अज्ञात तरुणाचा शेत शिवारात आढळला मृतदेह..

एका अज्ञात तरुणाचा शेत शिवारात आढळला मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील  लाडबोरी गाव नजीकच्या शेत शिवारात आज,बुधवार १८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका अज्ञात तरुणाचा चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.घटनेची माहिती होताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी करीत सिंदेवाही पोलिसांना पाचारण केले.लागलीच सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार कांचन पांडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची पाहणी करून परिसरातील कुण्या तरुणाचा मृतदेह असल्यास कळविण्याचे आवाहन केले.प्रसंगी उपस्थित नागरिकांनी सदर तरुण परिसरातील नसल्याचे स्पष्ट करताच पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.मृत व्यक्तीचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे असून अंगात लाल रंगाची शर्ट व निळसर रंगाचा पँट घातलेला आहे.सदर तरुण शेत शिवारात कशासाठी गेला होता, त्याला कुणी मारून फेकले की काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे असून मृताची ओळख पटविण्याचे काम सिंदेवाही पोलिसांकडून सुरू आहे.त्यातच,शवविच्छेदन अहवालातून तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!