- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-चंद्रपूरहून गडचांदूरकडे येत असतांना गडचांदूरपासून ७ किलोमीटरवरील रस्त्याच्या कडेला ट्रक क्रमांक-एमएच-१८/एन-६६५६ या उभ्या ट्रकला
भरधाव कारने मागून धडक दिल्याने चार तरुण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला असल्याची घटना लखमापूर-निमणी मार्गावर काल, मंगळवारी १३ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली.मृत तरुण जिवती तालुक्यातील आहेत.त्यामध्ये सूरज गव्हाले वय २२ वर्षे,शेणगाव,सुनील किजगीर वय २७ वर्षे, शेणगाव,आकाश पेंदोर वय २२ वर्षे,पाटण,श्रेयश पाटील वय २२ वर्षे,टाटाकोहोड ता.जिवती अशी मृतांची नावे असून,गंभीर जखमी अजय गायकवाड (कोलामगुडा)याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.जिवती तालुक्यातील ५ तरुण कारने एमएच-०४/एफआर-४०८१ चंद्रपूरहून गडचांदूरकडे येत होते.गडचांदूरपासून ७ कि.मी.वर रस्त्याच्या कडेला ट्रक (एमएच-१८/एन-६६५६) उभा होता.या ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली.त्यात चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर अजयला जखमी अवस्थेत गडचांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करून नंतर चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात हलविले.
- Advertisement -

