Monday, September 21, 2026
Homeदेसाईगंजआमदार रामदास मसराम यांच्या हस्ते 'देसाईगंज शेतकी खरेदी-विक्री' धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन..

आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते ‘देसाईगंज शेतकी खरेदी-विक्री’ धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते आज,गुरुवार १२ डिसेंबरला दुपारच्या सुमारास कुरुड बसस्थानक नजिक असलेल्या ‘देसाईगंज शेतकी खरेदी-विक्री’ धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
‘देसाईगंज शेतकी खरेदी-विक्री’ धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम यांचे संस्थेचे पदाधिकारी तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर आमदार मसराम यांनी वजन काट्याची विधिवत पूजा करून धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन केले.प्रसंगी आमदार मसराम यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना शेतकरी बांधवांच्या समस्या तथा तक्रारीचे निवारण तात्काळ करून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी आमदार रामदास मसराम,जिल्हा पणन अधिकारी तीवाडे,देसाईगंज माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले, माजी पंचायत समिती उपसभापती नितीन राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे शाखाप्रमुख पुरुषोत्तम दुपारे,संस्थेचे अध्यक्ष अण्णाजी तुपट,उपाध्यक्ष लईराम तीतीरमारे,व्यवस्थापक तलमले,संचालक संजय पत्रे, घनश्याम टिकले,ग्रेडर ज्ञानेश्वर बुल्ले सह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!