Thursday, October 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता प्रवाशांच्या खिशाला बसणार झळ; लालपरीचा प्रवास महागणार..

आता प्रवाशांच्या खिशाला बसणार झळ; लालपरीचा प्रवास महागणार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महायुतीचे सरकार नवे सरकार स्थापन झाले असून आता प्रवाशांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे.कारण लालपरीचा प्रवास महागणार आहे.राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. कर्मचाऱ्यांचे वाढते वेतन,इंधन दरवाढ तसेच इतर सुट्ट्या भागांची दरवाढ झाल्याने तिकीट भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव दिला जाणार असल्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी स्पष्ट केले आहे.यावरून एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले प्रवाशांना झटका देण्याच्या तयारीत आहेत.
महामंडळाच्या प्रस्तावावर राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार,हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाडेवाढीवर शिक्कामोर्तब होणार की,प्रवाशांना दिलासा दिला जाणार,हेही लवकरच स्पष्ट होईल.मागील काही वर्षांपासून भाडेवाढ झाली नसल्याने महामंडळ भाडेवाढीसाठी आग्रही आहे.त्यामुळे राज्यातील प्रवाशांना लवकरच भाडेवाढीला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याचे संकेत भरत गोगावले यांनी दिले आहेत.
भरत गोगावले यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली.भंडारा व नाशिक येथील बसचा अपघात तसेच नुकत्याच बेस्ट चालकांकडून घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उद्देशाने चालक प्रशिक्षण,चालकांची निवड चाचणी, त्यांचे मानसिक आरोग्य याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष वाहन उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!