- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या गांधी वार्डातील स्थानिक नागरिक बऱ्याच दिवसांपासून पाणी टंचाई,रस्ते,नाली व विविध सार्वजनिक समस्यांना सामोरे जाऊन नगरपरिषद प्रशासनाप्रती रोष व्यक्त करीत होते.सदरची बाब आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या निदर्शनास येताच लगेच त्यांनी आज,मंगळवारी शहरातील गांधी वार्डातील स्थानिक नागरिकांची भेट घेत संवाद साधत समस्यांची दखल घेऊन देसाईगंज नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करून तात्काळ समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
कित्तेक दिवसांपासून शहराच्या गांधी वार्डात समस्यांचा डोंगर उभा आहे.अशातच देसाईगंज नगर परिषद प्रशासनाच्या वतीने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.बऱ्याच कालावधीपासून वार्डातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली,नागरिकांना
पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे.कित्तेक नाल्यांची सफाई नाही,काही ठिकाणची नाली बांधकामे व इतर सार्वजनिक कामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात होती.त्यामुळे नागरिकांच्या समस्या संदर्भात आमदार मसराम यांनी गांधी वार्डात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. दरम्यान,नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. परिसरात पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. तसेच रस्त्यांची दयनीय अवस्था आणि नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत.आमदार मसराम यांनी दखल घेत तात्काळ नगर परिषदेचे अधिकारी गेडाम तसेच नंदनवार यांना घटनास्थळी बोलावून वार्डातील समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देऊन पाणीपुरवठा,रस्ते व नाल्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले.प्रसंगी वार्डातील समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात,अशी अपेक्षा गांधी वार्ड वासियांनी व्यक्त केली.
- Advertisement -

