Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूर'आफ्रिकन जायंट' गोंगलगाय जगभरातील अनेक देशात धोकादायकच... - ब्रम्हपुरीसह देसाईगंज शहरातही येतेय...

‘आफ्रिकन जायंट’ गोंगलगाय जगभरातील अनेक देशात धोकादायकच… – ब्रम्हपुरीसह देसाईगंज शहरातही येतेय आढळून…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-ब्रम्हपुरीच्या शेषनगर परिसरात ‘आफ्रिकन जायंट’ गोंगलगाय आढळली आहे.या गोगलगायीच्या पाठीवर तिच्या वजनापेक्षा मोठ्या आकाराचा शंख तयार झाला आहे. यामुळे तिला जास्त हालचाल करता येत नाही. येथील वन्यजीव अभ्यासक प्रा.ललित उरकुडे यांना ही गोंगलगाय आढळून आली.
अर्थ कंजरवेशन संस्थेचे सदस्य ईशान वठे,चेतन राखडे,भूपेश राखडे,आर्यन राखडे,गणेश बुराडे यांच्या मदतीने परिसराचा शोध घेण्यात आला.या शोधमोहिमेतून गोंगलगायींना निष्ट करण्यात आले.या गोंगलगाई जगभरातील अनेक देशात धोकादायक घोषित करण्यात आले आहे.या प्रजातीने केरळ राज्यातील अनेक जिल्ह्यात थैमान घातले आहे.शेती व फळबागा या गोंगलगाई फस्त करतात.त्यामुळे यांना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहे.ही प्रजाती विदर्भात नागपूर,नवेगाव बांध व देसाईगंज(वडसा) येथे आढळून येत आहेत.
डॉ.गोपाल पालीवाल,सदस्य राज्य जैवविविधता मंडळ👇
जायंट आफ्रिकन गोगलगाय ही सर्वात  हानीकारक प्रजातीपैकी एक प्रजाती आहे.ही ५०० पेक्षा जास्त प्रकारची पिके आणि शोभेच्या वनस्पती खाण्यासाठी ओळखले जाते.ही गोंगलगाय इतर प्राणी आणि लोकांसाठी गंभीर धोका आहे; परजीवी (रोग निर्माण करणारे जीव) प्रसारित करण्यास जबाबदार आहे.या
गोंगलगायीला पिकांचे आणि प्राण्यांच्या जीवनाचे नुकसान होण्यापासून नियंत्रित करण्यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.
ललित उरकुडे,वन्यजीव अभ्यासक ब्रम्हपुरी👇
या गोंगलगाई १८४७ पासून भारतात ब्रीटिशाद्वारे अन्न व बागत पाळीव प्राणी म्हणून आणण्यात आले होते. ही प्रजाती भारतीय पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक असून यांच्या विष्टेपासून वनस्पतींवर विविध किडींचा प्रादुर्भाव जाणवतो.ही गोंगलगाय एक ते सव्वा किलोपर्यंत वजनात वाढू शकते व पहिल्या पावसात एकूण ८०० ते १२०० अंडे देण्यास सक्षम असते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!