Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपुढील आठवड्यापासून पावसाचे होणार पुनरागमन.. - अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता..

पुढील आठवड्यापासून पावसाचे होणार पुनरागमन.. – अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या वरुणराजाने आज पुणे,नाशिक,येवला अमरावती येथे हजेरी लावली. दमदार पाऊस झाल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.शनिवारी सांगलीतही ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. महाबळेश्वर खोऱ्यातही तुफान पर्जन्यवृष्टी झाली आहे. या पावासामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली.दरम्यान,पुढील आठवडा पावसाचा असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील ४,५ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. साधारणपणे पुढील आठवड्यात वरुणराजा दुपारी तसेच संध्याकाळी वरुणराजा हजेरी लावेल; अशी शक्यता हवामानतज्ज्ञ के.एस.होसळीकर यांनी वर्तविला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,राज्यात पुढील आठवड्यापासून पावसाचे पुनरागमन होणार आहे.कोकण,मध्य महाराष्ट्र,मराठवाडा,विदर्भात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान,पुढील ३६ ते ४८ तासात पावसाचे पुनरागमन होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनीही एबीपी या वृत्तवाहिनीला दिली होती.पुढील आठवड्यात तापमानात घट होईल,असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.पुढील आठवड्यात पावसासाठी पोषक वातावरण असल्याने वारे जोरदार वाहतील,त्यामुळे झाडे कोसळणे,वीज कोसळणे, पाणी साचण्याची घटना घडतील,यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी; अशी सुचना हवामान विभागाने दिली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला.राज्यातील कोकण,मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला.दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाची तीव्रता कमी झाली असून राज्यात सर्व भागात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहणार आहेत.मुंबईसह ठाण्यात देखील पुढील आठवड्यात हलक्या पावसाला सुरूवात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!