Thursday, September 3, 2026
Homeकुरखेडाआज कुरखेडाच्या धमदीटोला येथे सामुहिक विवाह सोहळ्यात आदिवासी कंवर समाजाचे २२ जोडपी...

आज कुरखेडाच्या धमदीटोला येथे सामुहिक विवाह सोहळ्यात आदिवासी कंवर समाजाचे २२ जोडपी विवाहबद्ध…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली:-कुरखेडा तालुक्याच्या
धमदीटोला येथे आदिवासी कंवर समाज क्षेत्रिय समीती नान्ही यांच्या वतीने आज,रविवार २० एप्रील  रोजी दूपारी ३ वाजेच्या सुमारास आदिवासी कंवर समाजाच्या सामुहिक विवाह सोहळ्यात महाराष्ट्र व छत्तीसगड येथील २२ जोडपी विवाहबद्ध झाली. मागील अविरत २१ वर्षांपासून कंवर समाजाच्या वतीने धमदीटोला येथे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे व या सोहळ्यात मोठ्या संख्येने कंवर समाजातील जोडपी विवाहबद्ध होत भावी जिवनास सुरुवात करतात.
सामुहिक विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आदिवासी कंवर समाजाचे जिल्हाध्यक्ष महासभा राजनांदगांव बिंदुलाल फूलकूंवर होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार रामदास मसराम,आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दूधनांग,कंवर समाज संघटनेचे मार्गदर्शक डॉ.मेघराज कपूर, माजी जि.प.उपाध्यक्ष जिवन पाटील नाट,अर्जुनी-मोरगांव पं.स.सदस्य फूलचंद बागडेरीया,कंवर समाज क्षेत्रिय अध्यक्ष सुनेर सोनटापर,माजी पं.स.सभापती गिरीधर तितराम,माजी पं.स.सभापती अंबिका बंजार, देवरीचे शिक्षक गुलाब सोनकूकरा,कंवर समाज जिल्हा उपाध्यक्ष रामजी चंन्द्रवंशी,पितांबर अरगदूल्ला,क्षेत्रीय अध्यक्ष पिंडकेपार उमेश बागडेरीया,महिला क्षेत्रीय अध्यक्ष चंपाबाई सोनकूकरा,कोटगूलच्या निराबाई दूधकंवर, क्षेत्रीय अध्यक्ष कोरची भिकम फूलकंवर, क्षेत्रिय अध्यक्ष चिपोटा जासलराम सांगसूरवार,नान्ही-कुरखेडा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच कर्मचारी समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना आमदार रामदास मसराम यानी कंवर समाजाच्या विकासाकरीता आवश्यक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.तसेच स्पर्धा परिक्षेत आदिवासी विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून गावागावात अभ्यासीका सूरू करण्याचे मनोदय व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनेरजी सोनटापर,सूत्रसंचालन निलकंठ बखर तर आभारप्रदर्शन गणेश सोनकंलगी यांनी केले.यशस्वीतेकरीता सर्व समाज बांधवानी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!