Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तधक्कादायक..! ऑनलाईन चक्री गेमच्या नादात पठ्ठ्याने गमावले ९० लाख रुपये...

धक्कादायक..! ऑनलाईन चक्री गेमच्या नादात पठ्ठ्याने गमावले ९० लाख रुपये नगदी,६ एकर जमीन आणि दोन तोळे सोने..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-अँड्रॉइड मोबाईलमुळे ऑनलाईनचे जाळे दूरवर पसरले गेले आहेत.त्यातच ऑनलाईन गेमिंग ॲप व त्याचा वापर करणारे अनेकजण आहारी जाऊन सर्वकाही गमावून बसू लागल्याच्या घटना सर्वत्र उघडकीस आल्या आहेत.मात्र,सर्वांना आश्चर्यचकित तितकीच धक्कादायक घटना एका तरुण शेतकऱ्याच्या बाबतीत नुकतीच उघडकीस आली आहे.एका तरुण शेतकऱ्याने पाच दहा-लाख रुपये नाही तर ऑनलाईन चक्री गेमच्या नादात चक्क तब्बल ९० लाख रुपये नगदी,६ एकर जमीन आणि दोन तोळे सोने गमावले आहेत.एकवेळ तरी गेम जिंकेन,असे म्हणता-म्हणता सर्वकाही पणाला लावले.पण शेवटी तो हरला व संपत्तीला मुकला म्हणण्याची आता त्याच्यावर वेळ आली आहे.सदरची  धक्कादायक घटना सोलापूर जिह्यातील कुईवाडीत उघडकीस आली आहे.भाबड्या आशेवर या तरुणाची सर्व संपत्ती हातातून गेली.बालाजी खरे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.तो दोन वर्षांपासून मोबाईलवर जुगार खेळाचा,परंतु त्याला या गेममध्ये कधीच पैसे मिळाले नाहीत.फसवणूक झाल्याचे समजताच त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.चक्री गेम हा एक ऑनलाइन गेम असून तो एकप्रकारचा जुगार आहे.या गेममध्ये झटपट पैसे कमवण्याचे आमिष दाखवले जाते.हा गेम खेळणारे अनेक तरुण देशोधडीला लागले आहेत.हा गेम खेळण्यासाठी बालाजीने एजंटला लाखो रुपये मोजले.एजंटला पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करायचा.पैसे पाठवल्यानंतर गेम खेळण्याची मुभा मिळायची.गेलेले पैसे एक दिवस परत येतील,या आशेवर बालाजी गेमध्ये इतका गुरफटला की,आपण काय करतोय? याचे सुद्धा भान त्याला नव्हते.भान आले तेव्हा त्याने सर्वकाही गमावून बसले होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!