Saturday, May 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमन हेलावणारी घटना..! अज्ञात इसमाने रेल्वे गाडीत दगड फेकल्याने चिमुकलीच्या डोक्याला लागून...

मन हेलावणारी घटना..! अज्ञात इसमाने रेल्वे गाडीत दगड फेकल्याने चिमुकलीच्या डोक्याला लागून मृत्यू.. – कुटुंबीयांचा एकच आक्रोश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर शहरात मन हेलावणारी घटना उघडकीस आली आहे.यात्रेवरून पती,पत्नी व चार वर्षीय चिमुकली विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्सप्रेसमधून सोलापूरला परत येत असतांना टिकेकरवाडी स्टेशनच्या पूर्वी तीन ते चार किलोमीटर अंतरावरून पाठीमागे डावीकडून भरधाव वेगाने एक दगड आला आणि तो दगड चार वर्षीय चिमुकलीच्या डोक्याला लागल्याने त्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार २० एप्रिल रोजी घडली.आरोही अजित कांगले असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.मुलीचा मृत्यू झाल्याचे पाहून वडील रडत रडत बोलत होते की,ती मला ‘ये पप्पा…ये पप्पा म्हणाली… माझा जीव गेला असता चाललं असतं पण…’ हा आक्रोश पाहून रुग्णालयातील उपस्थितांच्या आणि डॉक्टरांच्या देखील डोळ्यातील अश्रू अनावर झाले.
माहितीनुसार,गेल्या बऱ्याच वर्षांपासून कांगले कुटुंबीय एप्रिल महिन्यात ‘लच्चन’ यात्रा महोत्सवास जात असतात.अशातच यात्रा महोत्सवावरून विजयपूर ते रायचूर पॅसेंजर रेल्वे गाडीने सोलापूरला परत येत असतांना वाटेतच अज्ञात इसमाने एक भला मोठा दगड रेल्वे गाडीच्या दिशेने फेकला.दगड फेकताच चार वर्षीय आरोही हिच्या डोक्याला लागला.दगड डोक्याला लागताच आरोहीच्या वडिलांनी डोक्याला हात लावला.डोक्यातून प्रचंड रक्त वाहू लागल्याने रेल्वेतून उतरुन चिमुकलीला उपचारासाठी सोलापूरच्या रघुजी रुग्णालयात दाखल केले.मात्र,डॉक्टरांनी तपणी करताच मृत घोषित केले.आपल्या पोटच्या लेकीचा मृतदेह जेव्हा बाहेर आणला तेव्हा कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

लाखांदूर-देसाईगंज मार्गावर पेटत्या कारचा थरार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर-देसाईगंज मार्गावरील दुर्गा माता मंदिर पहाडीजवळ भर उन्हात पेटत्या कारचा थरार काल शुक्रवारी घडला.लाखांदूरहून निघालेली कार सोनी-चप्राळ पहाडीजवळ येताच धावत्या...

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!