Wednesday, August 26, 2026
Homeआरमोरीअल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी.. -...

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी.. – आरमोरी तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील २० वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केल्या प्रकरणी आरमोरी पोलिसांनी आरोपी तरुणास पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली असल्याची घटना तीन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी २४ ऑक्टोंबर घडली.सदरची घटना आज,रविवारी दिनांक-२७ ऑक्टोंबरला उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.विनोद घनश्याम पात्रीकर वय २० वर्षे रा.इंजेवारी ता.आरमोरी असे आरोपीचे नाव आहे.अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पिडीतेची आई ही २२ ऑक्टोंबर २०२४ रोजी बाहेरून काम करुन घरी परतल्या.घरी परतल्याने पिडीता मुलगी घरी आढळून आली नाही.त्यानुसार कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध घेऊनही मुलीचा थांगपत्ता न लागल्याने आरमोरी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला.त्यानुसार पोलिसांनी मुलीच्या लोकेशन बाबत शोध घेतला असता मुलगी आढळून आली.मात्र,मुलीच्या आईने मुलगी मिळाल्यास कुठलीही तक्रार करणार नसल्याचे लेखी लिहून देत मुलीला घरी घेऊन गेली.दिनांक-२३ ऑक्टोंबर रोजी पिडीतेच्या आईला व नातेवाईकांना पिडीता गर्भवती असल्याबाबत शंका आल्याने पिडीतेच्या आईने केलेल्या तपासणीत पिडीता ही गर्भवती असल्याचे लक्षात आले.पिडीतेला विश्वासात घेवून तिच्या आईने विचारले असता,पिडीतेने इंजेवारी येथील विनोद पात्रीकर याने आपल्यासोबत शारिरीक सबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले.त्यानुसार पिडीतेच्या आईने आरमोरी पोलीस ठाणे गाठून तोंडी रिपोर्ट दाखल केली. तक्रारीनुसारआरमोरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात कलम ३७६ (२) (१),३७६ (२) (नं, भां.द.वी.सहकलम ४,६,८,१२, बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद करीत २४ ऑक्टोबरला आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीवर गुन्हा दाखल होताच आरोपीस न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती राक्षे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!