नवी दिल्ली :-अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा रंगली होती.आता या चर्चांवर पूर्णविराम लागला असून आतिशी मार्लेना या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत.अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. याला पक्षातील आमदारांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील.आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील.यापूर्वी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित या दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री राहिल्या आहेत. त्यानंतर आता आतिशी यांना हा मान मिळणार आहे.याआधी आम आदमी पक्षाच्या पॉलिटीकल अफेअर्स कमिटीचया (पीएसी) नेत्यांनी दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचे नाव सुचवले होते. काल,सोमवारी १६ सप्टेंबरला पीएसीची बैठक झाली होती.या बैठकीत आतिशी यांचे नाव सुचवले होते.अरविंद केजरीवाल यांनी रविवारी १५ सप्टेंबरला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती.यानंतर सायंकाळी साडेचार वाजता अरविंद केजरीवाल आणि भावी मुख्यमंत्री आतिशी आणि अन्य कॅबिनेट मंत्री नायब राज्यपाल विनीत सक्सेना यांच्या कार्यालयात पोहचले.सायंकाळी ४.४५ वाजता दिल्लीचे नायब राज्यापल विनय सक्सेना यांच्याकडे केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. आता दिल्ली सरकारने २६ आणि २७ सप्टेंबरला विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावले आहे.अरविंद केजरीवाल यांना ईडीने २१ मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक केली होती. यानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली होती.सीबीआयच्या खटल्यात त्यांना १३ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता.तर, ईडीच्या खटल्यात त्यांना आधीच जामीन मिळाला होता.त्यामुळे ते १३ सप्टेंबरला तिहार तुरुंगातून बाहेर आले.यानंतर रविवारी १५ सप्टेंबरला आप कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.मला अग्निपरीक्षा द्यायची आहे.जोपर्यंत जनता मला माझ्या प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देत नाहीत; तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही; असे केजरीवाल म्हणाले होते.
कोण आहेत आतिशी मार्लेना👇

