Saturday, August 8, 2026
Homeगोंदियारात्री १ वाजताच्या सुमारास अचानक मिलमध्ये लागली आग.. - ३५ मजूर होते...

रात्री १ वाजताच्या सुमारास अचानक मिलमध्ये लागली आग.. – ३५ मजूर होते कामावर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-गोंदिया शहराच्या लगतच असलेल्या मुरपार या ठिकाणी ऑइल मिलला १७ सप्टेंबरच्या रात्री १ वाजता च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी मिल मध्ये कामावर असलेल्या ३५ मजूरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.मात्र,मिल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.शहरापासून काही किमी अंतरावर मुरपार हे गाव असून येथे जिमी गुप्ता यांच्या मालकीची ऑईल मिल आहे.दरम्यान,मिलमध्ये धानाच्या कोंड्यापासून तेल काढण्याचे काम सुरू होते.त्यातच रात्री १ वाजताच्या सुमारास अचानक मिलमध्ये आग लागली.काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले.यावेळी ३५ मजूर कामावर होते. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. दरम्यान,अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून बंबांनी दहा तास पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आली.सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.तर मिल मध्ये फसलेल्या सर्व ३५ मजूरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.मात्र, या घटनेत मिल मालकाचे जवळपास दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज असून घटनेची माहिती रावनवाडी पोलिसांना देण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!