Tuesday, September 1, 2026
Homeचंद्रपूरअपक्ष आमदार किशोर जोरगेवार आता तुतारी ऐवजी कमळ घेणार हाती; उद्याला पक्ष...

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आता तुतारी ऐवजी कमळ घेणार हाती; उद्याला पक्ष प्रवेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आता तुतारी ऐवजी कमळ हाती घेणार आहेत.मागील निवडणुकीत चंद्रपूर विधानसभा मतदरसंघातून काँग्रेस आणि भाजपा उमेदवारांचा जोरगेवार यांनी दारूण पराभव केला होता.गेल्या काही दिवसांपासून जोरगेवार यांच्याबाबतीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. किशोर जोरगेवार शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते; परंतु त्याला स्थानिक काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोध केला.त्यानंतर जोरगेवारांचा राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश खोळंबला.आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत.
किशोर जोरगेवारांचा राष्ट्रवादीतील प्रवेश खोळंबल्यानंतर ते भाजपात पक्षप्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती.मात्र,त्याला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध केला.मुनगंटीवारांनी त्यांची नाराजी थेट दिल्लीत व्यक्त केली.त्यामुळे किशोर जोरगेवार हे पुन्हा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते.परंतु भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर केली असून अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजपा पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा आहे.
उद्या सकाळी ११ वाजता अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजपा पक्षप्रवेश चंद्रपूरात पार पडणार आहे.यावेळी सुधीर मुनगंटीवार उपस्थित असणार आहेत.भाजपा नेतृत्वाकडून किशोर जोरगेवारांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाल्याने मुनगंटीवारांचा विरोध मावळल्याचे समोर आले आहे. किशोर जोरगेवार हे चंद्रपूरातून भाजपाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशामागे माजी खासदार हंसराज अहिर यांचे पाठबळ लाभल्याने जोरगेवारांचा भाजपा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!