- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली बूज येथील महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉक्टरांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही,तोपर्यंत मृतदेह हलणार नाही; असा आक्रमक पावित्रा कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी घेत चौकातील भर रस्त्यावरच महिलेचा मृतदेह ठेऊन ठिय्या आंदोलन सुरू केला आहे.मेघा आकाश बनारसे,असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,लाखांदूर तालुक्याच्या विरली बूज येथील मेघा आकाश बनारसे या महीलेची काही महिन्यांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र सरांडी बूज या ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला पुढील उपचाराकरीता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.त्यानुसार कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात दाखल करून काही दिवसांत सुट्टी घेतली.प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने भंडारा रुग्णालयात वारंवार जावे लागले.सुधारणा न झाल्याने परत ब्रम्हपुरीच्या खासगी रुग्णालयात दोनदा शात्रक्रिया करण्यात आल्या.शत्रक्रिया केल्यानंतरही प्रकृती आणखी खालावल्याने नागपूरच्या मेडिकल मध्ये काल, शनिवारी १८ जानेवारीला भरती करण्यात आले. त्यानुसार उपचार सुरू असतांना मेघाची प्राणज्योत मावळली.मेघाच्या मृत्यूची बातमी गावकऱ्यांना कळताच गावकऱ्यांनी आज,रविवार १९ जानेवारीला मेघाचा मृतदेह घेऊन चौकातील भर रस्त्यावरच शेकडो महिला-पुरुषांनी रास्ता रोको सुरू करून ठिय्या आंदोलन पुकारले आहे.जोपर्यंत दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार नाही,तोपर्यंत जाग्याहून हलणार नाही; असा पावित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.
- Advertisement -

