- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी नैनपूर नगर परिषद शाळेचे चिमुकले मंत्री बनल्याचे मजकूर वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असला असेल, पण हे खरे आहे.देसाईगंज नगर परिषदेतंर्गत येणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर येथे आज,शनिवार १९ जुलै रोजी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक लोकशाही व पारदर्शक पद्धतीने पार पडली.यात मुख्यमंत्री,गृहमंत्री,पर्यावरण मंत्री, स्वच्छता मंत्री आणि पोषण आहार मंत्री म्हणून शालेय विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.यातील मतदान ईव्हीएम वोटिंग ॲपच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात घेण्यात आले.
शालेय निवडणूक प्रक्रियेची सुरुवात बुधवार १६ जुलै रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून झाली.निवडणुकीची माहिती सोशल मीडिया(व्हाट्सॲप,फेसबुक) व मौखिक स्वरूपात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली.गुरुवार १७ जुलै रोजी वर्गनायक व उपनायकांची निवड करण्यात आली.शुक्रवार १८ जुलै रोजी विद्यार्थ्यांनी शालेय मंत्रिमंडळासाठी उमेदवारी अर्ज भरले,ज्याची शुल्क रक्कम दोन रुपये होती. फॉर्मच्या दोन प्रतीतील पावत्या त्यापैकी एका विद्यार्थ्याकडे व एक शाळेकडे ठेवण्यात आल्या.एकूण ११ उमेदवार मंत्रिमंडळ निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.१८ जुलैच्या सायंकाळी निवडणुकीसाठी ४ वाजता उमेदवारांना निवडणूक चिन्हे प्रदान करण्यात आली आणि आज,शनिवार १९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मतदानास सुरुवात झाली.यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.मतदान झाल्यानंतर आज सकाळी ११.३० वाजता शालेय प्रांगणात निकाल जाहीर करण्यात आला.
- शालेय मंत्रिमंडळ २०२५-२६ चे निवडून आलेले उमेदवार👇
- मुख्यमंत्री– रिया उमाकांत कवासे,वर्ग ५ वा.
- गृहमंत्री– श्रेयश चंद्रशेखर नखाते,वर्ग ५ वा.
- पर्यावरण मंत्री-सोनाली कैलास मेश्राम,वर्ग ५ वा.
- स्वच्छता मंत्री-सक्षम गजानन कवासे,वर्ग ४ था.
- पोषण आहार मंत्री-रौनक रमेश भुते,वर्ग ४था.
कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमास केंद्रप्रमुख आमदार यांनी भेट देऊन विद्यार्थी मंत्रिमंडळ आणि लोकशाही या विषयावर प्रभावी भाष्य केले.शिक्षक ईश्वर गाहने यांनी सर्व मान्यवर व गावकरी मंडळींचे मनःपूर्वक आभार मानले.या निवडणुकीसाठी शिक्षक मंगेश तुपट यांनी तांत्रिक बाबींची जबाबदारी पार पाडली.कु.तृषाली सुखदेवे व प्राची खरकाटे यांनी मतदान केंद्राची रचना केली.सौ.अपर्णा जडे व सौ. प्रियंका तलमले यांनी मतदार याद्या तयार केल्या.या संपूर्ण प्रक्रियेत शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी समन्वय व मार्गदर्शन करून निवडणूक यशस्वी केली.सर्व नव्याने निवडून आलेल्या शालेय मंत्र्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी शाळेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
- Advertisement -

