Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशरण येण्यास सांगितले; पण गोळीबार सुरू केला आणि घात झाला..! - सहा...

शरण येण्यास सांगितले; पण गोळीबार सुरू केला आणि घात झाला..! – सहा नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी धाडले यमसदनी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १२ जुलै रोजी छत्तीसगडच्या सुकमा व बिजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील तब्बल ९ महिला नक्षलिंसह १४ पुरुष नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवत अहिंसेचा मार्ग पत्करून जिल्हा दल,डीआरजी सुकमा,विशा सुकमा, रेंज फील्ड टीम(आरएफटी) सुकमा,जगदलपूर, सीआरपीएफ-२,२२३,२२७,२०४,१६५ बटालियन, कोब्रा बटालियन २०८ सह गुप्तचर शाखेच्या पथकासमोर शरणागती पत्करली होती.शरणागती पत्करणाऱ्या नक्षलवाद्यांवर शासनाच्या वतीने १ कोटी १८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.त्यामुळे हळूहळू नक्षली संघटनांचे कंबरडे मोडू लागले असतांनाच परत काल शुक्रवारी काही नक्षलवाद्यांनी डोके वर काढण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा दलांनी हाणून पाडला.छत्तीसगडच्या अबुझमाड जंगल परिसरात काल शुक्रवारी चकमक उडाली.झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी सहा नक्षलवाद्यांना खात्मा केला आहे.सुरक्षा दलांच्या पथकास अबुझमाड जंगल परिसरात नक्षलवादी दडून बसल्याची माहिती प्राप्त होताच जंगल परिसरात नक्षलविरोधी कारवाईसाठी दाखल झाले.सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना शरण येण्यास सांगितले,पण त्यांनी गोळीबार सुरू केला. नक्षलवादी ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने सुरक्षा दलाने प्रत्युत्तरात सहा नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले. काल,शुक्रवारी १८ जुलै रोजी दुपारपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरूच होती.चकमक थांबताच शोध मोहिमेदरम्यान,६ नक्षलवाद्यांचे मृतदेह, एके-४७,एसएलआर रायफल,स्फोटके आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!