- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-बल्लारपूर शहरातील पेपर मीलच्या सातव्या गेटसमोर एका हायवा ट्रकने दुचाकीला उडविल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना काल,गुरुवारी २६ सप्टेंबरच्या दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.गोलू उर्फ भूषण उमरगुंडावार वय २२ वर्षे,रा.घोडपेठ,असे मृतकाचे नाव आहे.
सतीश लोखंडे वय ३४ वर्षे,रा.घुग्घुस हा गंभीर जखमी असून,बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.गोलू उमरगुंडावार व सतीश लोखंडे हे दोघे एमएच ३४ एडब्ल्यू ६१०७ क्रमांकाच्या दुचाकीने बल्लारपूरकडे जात होते.मागून येणाऱ्या हायवा ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.यात गोलू उमरगुंडावार हा जागीच ठार झाला तर सतीश लोखंडे हा गंभीर जखमी झाल्याने बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
गोलू उमरगुंडावार हा दुर्गापूर येथे पानठेल्यावर काम करीत होता.काल,गुरुवारी त्याने पानठेला मालकाची दुचाकी घेतली.बल्लारपूर येथे बहिणीला भेटून येतो म्हणून घुग्घूस येथील मित्र सतीश लोखंडे याला घेऊन बल्लारपूरकडे निघाला.परंतू,बल्लारपूरच्या सीमेवर हा अपघात घडला व बहिणीची भेट अधुरी राहिली. बल्लारपूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पेपर मील गेट क्रमांक सात जवळील सीसीटीव्ही तपासले. धडक देणारा ट्रक सुरजागडकडे गेल्याचा पत्ता लागला.तेव्हा पोलिस उपनिरीक्षक यांनी चमुसह आलापल्ली गाठून ट्रकचा शोध लावला.घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत.
- Advertisement -

