- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-तंत्र ज्ञानाच्या युगात संगणकाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.सर्व शासकीय कार्यालय,निम-शासकीय कार्यालय,खासगी संस्था,दुकाने व विविध आस्थापनांमध्ये संगणकाचा वापर करतांना दिसून येतात.अशातच शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संगणकाविषयी माहिती असावी,जेणेकरून भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू नये व योग्यरित्या संगणक हाताळता यावे; यासाठी विद्यार्थ्यांची निकड लक्षात घेता ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडे देसाईगंज तालुक्याच्या शाळांमध्ये संगणक संच उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.त्यानुसार शाळा तसेच विद्यार्थ्यांसाठी संगणक संच उपलब्ध करून वितरण करण्यात आल्याने ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
मनोज ढोरे यांनी या आधीही देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे आमदार सुधाकर अडबाले यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये किंमतीचे वाचनालय मंजूर करीत नुकतेच वाचनालय इमारत बांधकाम पुर्ण करण्यात आले आहे.मनोज ढोरे यांची ओबीसी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्यापासून त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधिंच्या सहकार्याने कुरुड-कोंढाळा जिल्हा परिषद क्षेत्रात अनेक विकास कामे केली असून आमदार अडबले यांचेकडे केलेल्या मागणीनुसार शाळांना संगणक संच उपलब्ध करून दिल्याने ढोरे यांनी अडबाले यांचे आभार मानले आहे.
संगणक संचामध्ये मॉनिटर,प्रिंटर व इतर साहित्य शाळांना वितरीत करण्यात आले आहेत.यामध्ये देसाईगंज तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल कुरुड,विद्या निकेतन लोकमान्य टिळक शैक्षणिक संकुल कोंढाळा,राधेश्याम बाबा विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कुरुड तसेच श्री तुकाराम विद्यालय कढोली या चार शाळांचा समावेश असुन या चारही शाळांना संगणक संच व प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शाळांना संच उपलब्ध करून देण्यात आल्याने संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी मनोज ढोरे यांचे आभार व्यक्त केले आहे.संच वितरीत करतांना जिल्हा परिषद हायस्कूल कुरुडचे मुख्याध्यापक वकिल शेख, कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत,विद्या निकेतन लोकमान्य टिळक शैक्षणिक संकुल कोंढाळाचे मुख्याध्यापक देशमुख,सांस्कृतिक विभाग काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मेश्राम, देसाईगंज पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन राऊत,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,कोंढाळा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,शेतकरी नेते श्याम मस्के तसेच शाळेचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते
- Advertisement -

