Monday, August 31, 2026
Homeमुंबईसुरक्षेची जबाबदारी झटकून कर्तव्यावर गैरहजर.. - ११ पोलीस शिपायांसह कारकुन निलंबित..

सुरक्षेची जबाबदारी झटकून कर्तव्यावर गैरहजर.. – ११ पोलीस शिपायांसह कारकुन निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-एखादी जबाबदारी दिली जाते; मात्र,ती झटकून हात वर करणारे आपण नेहमी बघत असतो.कर्तव्य बजावत असतांना कर्तव्यात कसूर करून ‘चलती का नाम गाडी’ असे अनेकांकडून केले जात आहे.असाच प्रकार पोलिसांच्या बाबतीत उघडकीस आला आहे.रिझर्व्ह बँक इमारतीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलिस हजेरी लावून गायब झाल्याने एकच खळबळ उडाली.या प्रकरणी १२ पोलिसांना निलंबित करण्यात आले असून,त्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.२२ सप्टेंबर रोजी नेहमीपेक्षा कमी पोलिस मनुष्यबळ असल्याचे आरबीआय व्यवस्थापनाच्या लक्षात आले. व्यवस्थापनाने पोलिस प्रशासनाकडे विचारणा केली असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली.रिझर्व्ह बँकेच्या नव्या आणि जुन्या इमारतींना पोलिसांच्या सशस्त्र विभागाने सुरक्षा पुरविली आहे.रिझर्व्ह बँकेच्या सुरक्षेसाठी ८० पोलिस शिपायांची नेमणूक केली आहे.त्यापैकी १४ शिपाई २२ सप्टेंबरला कर्तव्यावर गैरहजर असल्याचे चौकशीतून निदर्शनास आले. सशस्त्र विभागाच्या कारकुनाकडे चौकशी करताच तोही रजेवर होता.चौकशीत गैरहजर असलेल्या १४ पैकी ११ जणांनी त्या दिवसाची हजेरी लावल्याचे आढळले.मात्र,ते रिझर्व्ह बँकेत कर्तव्यावर नव्हते तर मुंबईबाहेर होते.कारकुनाने त्यांची हजेरी लावल्याचे स्पष्ट होताच ११ शिपायांसह कारकुनालाही निलंबित करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!