Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान...! सायबर फसवणुकीचा वापर फेसबुक,इन्स्टाग्राम, टेलिग्राम,व्हॉट्सॲप,यूट्यूब,शेअरचॅट च्या माध्यमातून.. - कुठल्याही आमिषाला बळी...

सावधान…! सायबर फसवणुकीचा वापर फेसबुक,इन्स्टाग्राम, टेलिग्राम,व्हॉट्सॲप,यूट्यूब,शेअरचॅट च्या माध्यमातून.. – कुठल्याही आमिषाला बळी पडू नये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्लॅटफॉर्मवरून आकर्षक जाहिरात किंवा अन्य कोणत्याही मार्गाने आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून फसवणुकीपासून दूर राहणे आवश्यक आहे.शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्यास एक महिन्यात दोनशे ते तीनशे टक्के नफा मिळेल,असे आमिष दाखवून लोकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले जाते.बनावट लिंकद्वारे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून मोठ्या कंपनीमध्ये शेअर दिल्याचे भासवतात. इन्स्ट्रा,फेसबुक,व्हॉट्सॲपवरून जास्त नफा कसा मिळते याबाबत खोटी कागदपत्रे व्हॉट्सॲप व सोशल मीडियावर पाठवून लोकांचा विश्वास संपादन करतात.
सुरुवातीला छोट्या रकमेचे मुद्दल व नफा कसे मिळते याबाबत माहिती देऊन लोकांचा विश्वास संपादन करतात.त्यानंतर छोट्या रकमेचे मुद्दल व नफा मिळवून देत पुन्हा जास्त गुंतवणूक करण्यास भाग पाडतात आणि फसवणूक करतात.
फेसबुक,इन्स्टाग्राम,टेलिग्राम,व्हॉट्सॲप,यूट्यूब, शेअरचॅट आदींवरून मॅसेज येतात.बऱ्याच दिवसांपासून साईट वापरत नसाल तर टू स्टेप व्हेरीफिकेशन झाले नाही तर ते अकाऊंट हॅक केले जाते.फोटो एडिट करून अश्लील व्हिडीओ व मॅसेज  तयार करून मित्रांच्या ग्रुपमध्ये पाठवणार आहे; अशी धमकी दिली जाते.ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात,अशा अनेक प्रकारे फसवणूक होऊ शकते.
सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे.हे गुन्हेगार जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही बसून फसवणुकीचे गुन्हे करू शकतात.आज मोबाइल प्रत्येकाच्या हातात आहे,इंटरनेट प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये आहे.
त्यामुळे फसवणूक होऊ शकते,असे जरी असले तरी नुकसान टाळण्यासाठी सावधानता बाळगणे हा एकमेव प्रभावी उपाय आहे.मोबाइल वापरणाऱ्या प्रत्येकाने ही काळजी घेतली पाहिजे.
धमकी,ब्लॅकमेलिंगचे फोन किवा मॅसेज येत असतील तर घाबरून जाऊ नका.फोनवरील व्यक्ती जसे सांगेल तशी कृती करू नका.संबंधितांचा व्हॉट्सॲप मोबाइल नंबर ब्लॉक करून टाका,अन्यथा जवळच्या पोलिस स्टेशन व सायबर सेलशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!