Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरअन् कर्मचारी शासकीय कार्यालयाच्या कॉम्प्युटरवर खेळू लागला पत्त्याचा गेम; व्हिडिओ व्हायरल..!

अन् कर्मचारी शासकीय कार्यालयाच्या कॉम्प्युटरवर खेळू लागला पत्त्याचा गेम; व्हिडिओ व्हायरल..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :- ‘शासकीय काम अन् पंधरा दिवस थांब’ अशी सर्वच ठिकाणची अवस्था झाली आहे.काम होत नाही म्हणून सर्वसामान्य नागरिक शासकीय कार्यालयाच्या सतत हेरझऱ्या मारत असतो.पण,अमके काम-ढमके काम सांगून ‘उद्या या,परवा या’ असे केले जाते आणि आज होणारे काम लांबणीवर नेले जाते.अश्यातच एका महाशायाकडे काम उरलेला नसावा,त्यामुळे त्याने चक्क शासकीय कार्यालयाच्या कॉम्प्युटरवर(संगणकावर) पत्त्यांचा गेम सुरू केला अन् जो खेळू लागला की,आपला कुणीतरी सुजाण नागरिक व्हिडिओ बनवत आहे; हेही विसरून गेला.आपल्याच धुंदीत असणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होताच,सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठली आहे.विशेष म्हणजे,राज्याचे माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतांनाच मोबाईलवर ऑनलाईन रमी सुरू केली होती.त्यामुळे त्यांना आता क्रीडामंत्री बनविण्यात आले आहे.त्यानुसार आता चक्क शासकीय कार्यालयात एक कर्मचारी पत्त्यांचा गेम खेळतांना दिसून येतो.सदरचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती पंचायत समितीत घडल्याचे उघड झाले आहे.प्रकरणी भद्रावती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी सदरचा व्हिडिओ पंचायत समिती कार्यालयाच्या कृषी विभागातील असल्याचे स्पष्ट केले.सदर प्रकार अत्यंत गंभीर असून,संबंधित कर्मचाऱ्यावर निश्चितच कारवाई केली जाईल.या प्रकाराची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवालाच्या स्वरूपात पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.सदरचा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा असून शासकीय कामे सोडून कार्यालयात पत्ते खेळणे कितपत योग्य आहे.अश्यांवर तात्काळ कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
  • व्हायरल व्हिडिओ👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!