Saturday, October 17, 2026
Homeकुरखेडारुग्णालय प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे रुग्णाचा मृत्यू..! - कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार; कुठे...

रुग्णालय प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे रुग्णाचा मृत्यू..! – कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार; कुठे फेडाल एवढे मोठे पाप..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-ज्या सेवा वेळेवर मिळायला पाहिजेत,अश्या सेवांच्या बाबतीत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली गेली.रुग्णाच्या जिवापेक्षा
१०२ क्रमांकाचे वाहन हवे असेल तर पैसे भरण्याचा सल्ला दिला गेला.रुग्ण गंभीर असूनही १०८ आपत्कालीन सेवा वेळेवर न मिळाल्याने उपचारास विलंब होऊन रुग्ण मृत्युमुखी पडल्याची घटना नुकतीच कुरखेडा तालुक्यात उघडकीस आल्याने रुग्णालय प्रशासनाच्या अनागोंदी आणि ढिसाळ कारभाराचे दर्शन घडून आले आहे.प्रकरणी अप्रव भैसारे यांनी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांना तक्रार दाखल केली आहे.
कुरखेडा तालुक्याच्या आंधळी/नवरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अप्रव भैसारे यांच्या कुटुंबातील सदस्य प्रेमीला श्यामराव भैसारे यांची प्रकृती सोमवार ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानकपणे गंभीर झाली.त्यामुळे त्यांनी तात्काळ १०८ क्रमांकावर कॉल करून आपत्कालीन सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेची मदत मागितली.परंतु,कोरची येथील कस्टमर केअर स्टाफकडून “एका तासात ऍम्ब्युलन्स पोहोचेल” असे सांगण्यात आले.त्यानंतर कस्टमर केअर स्टाफकडून १०८ रुग्णवाहिका वाहन चालकाचा संपर्क क्रमांक देण्यात आला.मात्र,त्या क्रमांकासोबत संपर्क होऊ शकला नाही.बराच कालावधी होऊनही रुग्णवाहिका आली नसल्याने रुग्णाची स्थिती गंभीर असल्यामुळे  वाट न पाहता एका खाजगी चारचाकी वाहनाने त्यांना उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे हलवले.तिथे डॉ. कवाडकर यांच्या सूचनेनुसार रुग्णाला पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला.त्यामुळे परत पुन्हा १०८ क्रमांकावर संपर्क साधला असता कस्टमर केअरच्या महिला कर्मचाऱ्याने पुन्हा एकदा “एका तासात ऍम्ब्युलन्स येईल” असे सांगितले.परंतु,कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला  आरोग्य कर्मचारीने स्पष्टपणे सांगितले की, “कोरची येथून वाहन यायला ३ तास लागतील,त्यामुळे १०२ क्रमांकाचे वाहन करा आणि २ हजार ४०० रुपये भरा तेव्हाच वाहन मिळेल”,अशी माहिती दिली.त्यामुळे रुग्णाला गडचिरोली येथे हलविण्यास बराच वेळ वाया गेला.अश्यातच १०८ क्रमांकाचे वाहन रुग्णालयात  असूनही योग्य मार्गदर्शन दिले गेले नाही.जे वाहन रुग्णालयात उपलब्ध होते,अश्या वाहनावर १०८ किंवा १०२ असा लिहिलेला कुठेही उल्लेख नव्हता.रुग्णाच्या गरिब परिस्थितीचा फायदा घेत चुकीची माहिती देऊन आर्थिक फसवणूक केली गेली.गंभीर रुग्णास योग्य वेळी उपचार मिळाले नसल्याने काल मंगळवार ५ ऑगस्ट २०२५ रोजी रुग्णाचा मृत्यू झाला.सदरचा प्रकार अत्त्यंत निषेधार्ह असून रुग्णाच्या जीवाशी खेळ केल्याप्रमाणेच आहे.अशा चुकीच्या व्यवस्थेची चौकशी करून संबंधित जबाबदारांवर कारवाई करावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत,यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात,असे अप्रव भैसारे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
विशेष म्हणजे,एखाद्याचे जीव महत्वाचे नसून २ हजार ४०० रुपये १०२ क्रमांकाच्या वाहनासाठी महत्वाचे होते.एका तासात येणारे वाहन कितीतरी तास उलटून आलेच नाही.एखाद्याचे जीव वाचविण्यात सारस्या नसेल तर किमान खोटे तरी बोलू नका.त्याच जागी एखाद्या लोकप्रतिनिधी वा मोठ्या राजकारणीचा नातलग असता तर एका फोनवर हालचाली सुरू झाल्या असत्या.कुठे फेडाल एवढे मोठे पाप..!
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!