Saturday, June 20, 2026
Homeचंद्रपूरअनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या दारिद्र रेषेखालील भूमिहीन कुटूंबाना मिळणार शेती..-चार एकर...

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या दारिद्र रेषेखालील भूमिहीन कुटूंबाना मिळणार शेती..-चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 चंद्रपूर :-  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या दारिद्र रेषेखालील भूमिहीन कुटूंबाना कायमचे उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे; तसेच त्यांच्या राहनीमानात बदल व्हावा; म्हणून त्यांना कसण्याकरिता चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन खरेदी करून उपलब्ध करून द्यावयाची आहे.जिल्ह्यातील गैर आदिवासी कुटुंबाकडून शेतजमीन खरेदी करावयाची असल्याने विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून सन २०२४-२५ करिता अर्ज मागविण्यात येत आहे.

जिरायत जमीन चार एकर व बगायती जमीन दोन एकर विक्री करण्यास तयार असल्यास संमती पत्रासह पटवारी साझानिहाय अर्ज जमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील किंवा वाटाघाटी करून जिल्हास्तरीय समितीद्वारे मुल्य निश्चित करण्यात येईल.अर्जासोबत जमिनीचा सातबारा,गाव नमुना आठ,परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी किंवा कर्ज बोजा बोजा नसल्याचे नाहरकत प्रमाणपत्र,अर्जदाराचे कुटुंबातील सख्खे भाऊ,पत्नी,मुले यांचे जमीन विकण्यासंबंधी नाहरकत व संमती प्रमाणपत्र आवश्यक आहे. जमिनीच्या खरेदी प्रक्रियेमुळे कोणतीही नुकसानभरपाई मागणार नसल्याबाबत तसेच जमीनबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरू नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचे १०० रुपये स्टँप पेपरवर शपथपत्र व हमीपत्र जोडण्यात यावे.सदर प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,चंद्रपूर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये पाठविण्यात यावे किंवा प्रत्यक्ष १५ मे २०२४ पर्यंत संपर्क साधावा; असे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण यांनी कळविले आहे.

आवश्यक कागदपत्रे👇

अर्जदाराने जातीचे प्रमाणपत्र,दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र,रहिवाशी दाखला,आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, निवडणूक ओळखपत्राची प्रत मोबाईल नंबर,पासपोर्ट आकाराचे फोटो,बँक खात्याचा तपशील, मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला, भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार यांनी दिलेला दाखला, वय ६० वर्षांखालील असल्या संबंधित वयाचा दाखला किवा पुरावा, शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्यांचे १०० रू. स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!