Friday, August 7, 2026
Homeगडचिरोलीग्रामीणमध्ये बोगस डॉक्टरांनी परवानगीविनाच थाटले रुग्णालय…-कारवाई अभावी अनेकांचे वाढले मनोबल..

ग्रामीणमध्ये बोगस डॉक्टरांनी परवानगीविनाच थाटले रुग्णालय…-कारवाई अभावी अनेकांचे वाढले मनोबल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- आरोग्य विभागाच्या कारवाई अभावी गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील ग्रामीण भागांत पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून कोणतीही पदवी नसताना रुग्णालये थाटून ते उपचार करीत आहेत. कोरोनाकाळातही त्यांनी लाखो रुपयांची माया जमविली.मात्र त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे अशा बोगस ‘मुन्नाभाई’चे मनोबल वाढले आहे.मागील कोरोनाचा काळ नागरिकांसाठी आपत्तीचा ठरला होता.अनेक कुटुंबांची कोरोनावरील उपचार घेताना हातातील पैसे गेले.अनेकांनी जमीन विकून उपचार केला.त्यातच बोगस डॉक्टरांचेही चांगलेच फावले.ज्या काळात ग्रामीण भागांत रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले होते,त्या काळात या डॉक्टरांनी लाखो रुपयांची माया जमविली.पदवी नसतानाही अशा डॉक्टरांकडून उपचार घेताना अनेक कुटुंबातील प्रतिष्ठित व्यक्तींना जीव गमवावा लागला.

अशी अनेक उदाहरणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पाहायला मिळाली.अशावेळी पदवी नसलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची गरज होती,जी दुर्दैवाने होऊ शकली नाही.त्यामुळे अशा अनेक बोगस डॉक्टरांनी लाखोंची मालमत्ता जमा केली आहे.परंतु आरोग्य विभागाकडून या प्रकारावर एकदाही कारवाई झालेली नाही.ग्रामीण भागांत हे डॉक्टर मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहेत.शिवाय ते आता खासगी दवाखानेही सुरू करीत आहेत तर काही गावांमध्ये आरोग्य विभागाची परवानगी नसतानाही नर्सिंग होम सुरू असल्याची चर्चा आहे.नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनलेल्या या विषयाला प्रशासन गांभीर्याने घेत नाही.त्यामुळे आता प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असून, त्यामध्ये पदवी नसलेल्या डॉक्टरांवर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!