Tuesday, September 22, 2026
Homeरायगडसुषमा अंधारेसह सर्वजण बालबाल बचावले..- घ्यायला आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश…

सुषमा अंधारेसह सर्वजण बालबाल बचावले..- घ्यायला आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

रायगड :-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले असून सुदैवाने सुषमा अंधारे यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुखरूप आहोत,अशी माहिती अंधारेंनी सोशल मीडियावर शेअर केल्याने समर्थकांचा जीवात-जीव आला.

सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्याच्या आधीच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने मोठा अनर्थ टळला.सुषमा अंधारे आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास बारामतीला रवाना होणार होत्या.महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाड येथून निघाल्या होत्या.यासाठी त्या हेलिपॅडवर पोहोचल्या.

इतक्यात हेलिकॉप्टरला अपघात झाला.हा प्रकार सुषमा अंधारे यांच्या डोळ्यादेखतच झाला.अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले असून सर्वजण सुखरुप आहेत.परंतु हेलिकॉप्टरची दृश्यं धडकी भरवणारी आहेत.हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र अपघातातून सर्वजण बालंबाल बचावल्याने दिलासा मानला जात आहे.महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरूप आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी; अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!