Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीजंगली हत्तींपासून सावधान- भामरागड वन विभागाकडून सूचना…

जंगली हत्तींपासून सावधान- भामरागड वन विभागाकडून सूचना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- भामरागड वन परिक्षेत्रातील जंगली हत्ती पुढे छत्तीसगढ राज्यातील जंगलात जाण्याची शक्यता असून त्यांचे द्वारे कोणतीही जिवीत हानी होऊ नये म्हणुन गावकऱ्यांनी घराच्या बाहेर एकटे रात्री अपरात्री निघू नये व हत्ती दिसल्यास त्याची छेडखानी न करता त्याबाबत तात्काळ वन विभागास कळवावे; असे उपवनसरंक्षक भामरागड वन विभाग यांनी कळविले आहे.

दिनांक-२५ एप्रिल रोजी वन परिक्षेत्र गट्टाचे कार्यक्षेत्रात वन्य प्राणी हत्तीचा वावर असल्याची सुचना मिळाल्यावर त्या वन परिक्षेत्रातील वन परिक्षेत्र अधिकारी, गट्टा,योगेश शेरेकर व क्षेत्रीय कर्मचारी यांचे मदतीने त्या हत्तीच्या हालचालीवर देखरेख ठेवत होते. त्याच दिवशी हत्ती जंगलाकडे जात असतांना सांयकाळी ०४.३० वाजता कक्ष क्रमांक ५२८ नियतक्षेत्र कियर, उपक्षेत्र नांरगुडा परिक्षेत्र गट्टा येथे जंगलात मोहाफुले व चारोळी गोळा करणे करिता गेलेले श्री गोगलु रामा तेलामी, रा. कियर ता. भामरागड जिल्हा- गडचिरोली वय ३८ वर्षे यांचेवर वन्य प्राणी हत्तीने हल्ला करून त्यांना ठार केले. सदरचे माहिती वन विभागाला मिळताच भामरागड वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पवार, व ईतर अधिकारी / कर्मचारी सह घटनास्थळी भेट देवुन घटनेचा पंचनामा करून श्री गोगलु रामा तेलामी यांचे शव विच्छेदनासाठी भामरागड रूग्णालयात पाठविले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. 

सदर जंगली हत्ती रात्री गट्टा वन परिक्षेत्रातुन भामरागड वन परिक्षेत्रात जात असतांना हिदुर गावात कक्ष क्रमांक ६९२ नियतक्षेत्र कृष्णारचे नजीक असलेल्या माता मंदीरात लग्न संभारभाकरिता पुजा आटोपुन परत येत असतांना हिदुर ता. भामरागड जिल्हा गडचिरोली, या गावातील तीन महिला सौ. राजे कोपा हलामी (वय ५५ वर्षे) सौ वंजे झुरू पुंगाटी (वय ५५ वर्षे) व सौ.महारी देवु वड्डे, वय ४७ वर्ष यांचेवर  हत्तीने हल्ला केला त्यात सौ. राजे कोपा हलामी, वय ५५ वर्षे यांचा मृत्यु झालेला असुन ईतर दोन महिलांवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. 

सदर घटनेची माहीती प्राप्त होताच दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी भामरागड वन विभागाचे उपवनसंरक्षक शैलेष मीना, घटनास्थळी पोहचले व त्यांनी उपस्थित वन परिक्षेत्र अधिकारी, भामरागड अमर भिसे, व ईतर वन विभागाचे कर्मचारी यांना हत्तीला छत्तीसगड राज्याच्या जंगलात हुसकावुन लावण्यासाठी उपाययोजना करण्याचे सुचना दिल्या. त्या जंगली हत्तीला गावापासुन दुर जंगलात हाकलण्यासाठी व त्याचे हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठी हुल्ला टिम व ड्रोन च्या सहयाने क्षेत्रीय कर्मचाऱ्यासह सहायक वनसंरक्षक अशोक पवार यांचे नियंत्रणात तसेच वन परिक्षेत्र अधिकारी, गट्टा, योगेश शेरेकर व वन परिक्षेत्र अधिकारी, भामरागड अमर भिसे, यांच्या नेतृत्वात संयुक्त गस्ती पथक निर्माण करून पुढील कार्यवाही सुरू आहे.नागरिकांनी सावध राहावे; अशा सूचना वन प्रशासनाने दिल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!