Wednesday, September 23, 2026
Homeनागपूरपती-पत्नीने मिळून मालकाला लावला चुना..-१९ लाख रुपये परस्पर हडपले; नागपूर येथील घटना 

पती-पत्नीने मिळून मालकाला लावला चुना..-१९ लाख रुपये परस्पर हडपले; नागपूर येथील घटना 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- एका दांपत्याने कपड्याचे दुकान सांभाळायला देणाऱ्या मालकाचीच १८.९० लाखांनी फसवणूक केली.दिवाळीच्या काळात ५६ दुकानदारांकडून आलेले पैसे दांपत्याने परस्पर स्वतःकडेच ठेवून घेतले.धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली.

जरीपटका येथील महेश सुंदरलाल जेठानी वय ४५ वर्षे व भव्या जेठानी वय ३४ वर्षे अशी आरोपी दांपत्याची नावे आहेत.सुरेश देवकुडे  वय ६३ वर्षे,भोसलेनगर, सक्करदरा यांचे छत्रपती चौक येथे रंगोली कलेक्शन या नावाने कपड्यांचे होलसेल दुकान आहे.त्यांनी २०२२ मध्ये जेठानी दांपत्याला दुकान सांभाळण्यासाठी दिले होते.त्यांनी दिवाळीच्या कालावधीत विक्री केलेल्या कपड्यांचा हिशेब

देवकुडे यांना दिलाच नाही.त्यामुळे त्यांना संशय आला.ज्या दुकानदारांना कपडे विकले,त्यांची भेट घेऊन विचारपूस केली असता; पैसे कधीच दिले असल्याची बाब समोर आली.आरोपी दांपत्याने ५६ दुकानदारांना कपडे विकून रोख रक्कम घेतल्याचे व ती रक्कम स्वतःच्या खात्यात वळती केल्याची बाब स्पष्ट झाली.देवकुडे यांनी धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार केली.पोलिसांनी जेठानी दांपत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!