Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूर अजब वन अधिकाऱ्याची गजब कहाणी...शिवीगाळ प्रकरणी निलंबन,नंतर ते रद्द आणि दुसऱ्या दिवशीच...

 अजब वन अधिकाऱ्याची गजब कहाणी…शिवीगाळ प्रकरणी निलंबन,नंतर ते रद्द आणि दुसऱ्या दिवशीच सेवानिवृत्ती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर (वरोरा) :- वरोरा येथील वनविभागाच्या कार्यालयात तीन वर्षापूर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून मधुकर राठोड रुजू झाले.त्यांनी चांगल्या प्रमाणात वनातील गौण खनिज चोरी व इतर चोऱ्यांवर अंकुश बसविला होता.वनामधून रेती चोरी मोठ्या प्रमाणात होत होती.त्यावर त्यांनी रेती असलेली अनेक वाहने कार्यालयात लावून त्यांच्यावर मोठा दंड आकारण्यात आला होता.त्यामुळे रेती चोरी करणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत होती.मधुकर राठोड यांची कारकीर्द सुरळीत सुरू असताना, त्यांच्याच एका कनिष्ठ कर्मचाऱ्यासोबत त्यांची ‘हमरी तुमरी’ झाली. प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत गेले. त्यानंतर मधुकर राठोड प्रकाशझोतात आले. वनकर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याने कर्मचारी संघटना आक्रमक झाली.त्यामुळे मधुकर राठोड यांना निवृत्तीच्या दोन महिने आधी निलंबित करण्यात आले.३१ जानेवारी रोजी ते निवृत्त होणार होते. म्हणून ३० जानेवारीला त्यांचे निलंबन रद्द करून त्यांना रुजू करण्यात आले व ३१ जानेवारीला सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला.

सेवानिवृत्तीच्या दोन महिन्यांपूर्वी निलंबित करून सेवानिवृत्तीला दोन दिवस शिल्लक असताना निलंबन रद्द करण्यात आले आणि त्याच दिवशी रुजू करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी ते अधिकारी सेवानिवृत्त झाले.वनविभागातील एका अधिकाऱ्याचा हा प्रवास आश्चर्यकारकच ठरला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; वाघाची पाठीमागून झडप..

उद्रेक न्युज वृत्त  नागभीड(चंद्रपूर):-गावाजवळच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून गुराख्यास गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आज,रविवार १२ जुलै रोजी दुपारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!