Wednesday, July 22, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाची बैठक संपन्न- माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांची...

कुरखेडा येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाची बैठक संपन्न- माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांची उपस्थिती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा :- तालुका शाखेच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी कार्यकर्त्यांची बैठक कुरखेडा येथील विश्रामगृहात पिरिपाचे जिल्हा अध्यक्ष मुनिश्वर बोरकर यांचा अध्यक्षतेखाली पार पडली.

सदर बैठकीला पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांची उपस्थिती होती.तर प्रमुख अतिथी म्हणुन रिपाईचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष गोपाल रायपुरे,पिरिपाचे संपर्क प्रमुख दिलीप पाटिल नागपूर आदी लाभले होते . बैठक प्रसंगी प्रा.कवाडे पिरिपा कार्यकर्‍यांना बोलतांना म्हतले की,आपणास राजकारण पेक्षा समाजकारण जास्त करावयाचे आहे.निवडणुका होतील तेव्हा होतील आपण आपली तयारी ठेवली पाहीजे.जिल्हयात अनेक समस्यां आहेत.बेरोजगारी वाढली आहे,नोकरी नाही,गरीबांच्या हाताला काम नाही;अश्या परिस्थितीत पक्ष कार्यकर्त्यांनी समाज हिताचे कार्य केले पाहीजे आणि डॉ.आंबेडकरांच्या कार्याला गती दिली पाहीजे.प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी गडचिरोली जिल्हयातील समस्या सांगून त्या सोडविण्याचे प्रा.कवाडे यांच्याकडे सांगीतले. 

सदर बैठकीला पिरिपाचे प्रमुख कार्यकर्ते अँड.सि.एम जनबंधु,प्रमोद सरदारे, मानिक डोंगरे,भुषण सहारे, सोनु साखरे,दयाराम खोबागडे, संतोष खोब्रागडे, अनिल बांबोळे,मोरेश्वर राऊत,अशोक अंबादे,रमेश जोगे,दादाजी रामटेके,वामन कोंटागले,बालक भानारकर,कार्तीक वट्टे,मानिक वालदे सहीत बहुसंख्य पिरिपा कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.प्रमोद सदर बैठकीप्रसंगी सरदारे यांनी आभार मानले .

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!